चंदीगड: आयपीएलमध्ये (IPL 2024) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यातील मॅचमध्ये  संजू सॅमसननं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या बॉलर्सनी कर्णधार संजू सॅमसननं घेतला निर्णय सार्थ ठरवला. पंजाब किंग्जला 8 विकेटवर 147 धावांवर रोखलं. पंजाब किंग्जकडून इम्पॅक्ट प्लेअर आशुतोष शर्मा आणि लियाम लिव्हिंगस्टोननं केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर पंजाब किंग्जनं 147 धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग राजस्थाननं यशस्वीपणे केला. शिमरन हेटमायरनं 27 धावांची खेळी करत पंजाबच्या हातातून विजय खेचून आणला. 


पंजाब किंग्जनं केलेल्या 147 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सनं सावध सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वाल आणि तनुष कोटियननं राजस्थानला चांगली सुरुवात करुन दिली. यशस्वी जयस्वाल आणि तनुष कोटियन या दोघांनी राजस्थानला 56 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली. तनुष कोटियन 24 धावांवर असताना त्याला लियाम लिव्हिंगस्टोननं त्याला बाद केलं. यानंतर यशस्वी जयस्वालला सूर गवसला असेल असं वाटत असताना त्याला देखील कगिसो रबाडानं बाद केलं. यशस्वी जयस्वालनं 39 धावा केल्या. 


राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसन आज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्याला 18 धावांवर रबाडानं बाद केलं. यानंतर रियान पराग 23 धावांवर बाद झाला. ध्रुव जुरेल देखील चांगली कामगिरी करु शकला नाही. रोवमेन पॉवेलनं 11 धावा केल्या. हेटमायरनं राजस्थानसाठी 


पंजाबचं राजस्थानला विजयासाठी 148 धावांचं आव्हान


होमग्राऊंडवर खेळणाऱ्या पंजाब किंग्जला आज मोठी धावसंख्या उभारता आली नाही.  पंजाबकडून आशुतोष शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, अथर्व तायडे आणि जॉनी बेयरस्टोनं चांगल्या धावा केल्या. आशुतोश शर्मानं सर्वाधिक 31 धावा केल्या. यानंतर जितेश शर्मानं  29 आणि लियाम लिव्हिंगस्टोननं 21 धावा केल्या. याशिवाय  अथर्व तायडे आणि जॉनी बेयरस्टोनं प्रत्येकी 15 धावा केल्या. 


राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पंजाबला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. केशव महाराज, आवेश खान यांनी पंजाबच्या दोन दोन विकेट घेतल्या. त्यांच्याशिवाय ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, युजवेंद्र चहल यांनी एक एक विकेट घेतली. 


पंजाबची कडवी लढत 


पंजाबनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 8 विकेटवर 147 धावा केल्या होत्या. मात्र, पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून बॉलिंग केली. पंजाबच्या गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना मोठे फटके मारु दिले नाहीत. राजस्थानच्या फलंदाजांचं स्ट्राइक रेट देखील चांगलं राहिलं नाही. नियमित अंतरानं विकेट गेल्यानं राजस्थानवर दबाव आला. 


संबंधित बातम्या  :


Rohit Sharma : आज तुझा भाऊ बस चालवणार, रोहित शर्माचा अनोखा अंदाज, चेन्नईला सूचक इशारा 


PBKS vs RR : पंजाबच्या बॅटिंगला राजस्थानच्या बॉलर्सनी सुरुंग लावला, सॅमसनचं प्लॅनिंग सक्सेसफुल, किंग्जला किती धावांवर रोखलं?