PBKS vs RCB live Score IPL 2024:पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार, दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती

PBKS vs RCB Live Score, IPL2024 : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज आणि रायल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. आज आयपीएलमधील 58 वी मॅच आहे.

युवराज जाधव Last Updated: 09 May 2024 11:40 PM
आरसीबीचा पंजाबवर 60 धावांनी विजय

आरसीबीचा पंजाबवर 60 धावांनी विजय.. सिराजच्या तीन विकेट

पंजाबला नववा धक्का

पंजाबला नववा धक्का बसलाय. सिराजने हर्षल पटेलला पाठवले तंबूत... आरसीबीची मोठ्या विजयाकडे वाटचाल

पंजाबला आठवा धक्का

सॅम करनच्या रुपाने पंजाबला आठवा धक्का बसलाय. 

पंजाबला सातवा धक्का

पंजाबला सातवा धक्का... सामन्यावर आरसीबीचं वर्चस्व

शशांक सिंह बाद

विराट कोहलीचा शानदार थ्रो... शशांक सिंह धावबाद... पंजाबला सहावा धक्का

अर्धा संघ तंबूत

पंजाबचा अर्धा संघ तंबूत... स्वप्निल सिंह याने लिव्हिंगस्टोनला शून्यावर बाद केले.. 

पंजाबला चौथा धक्का

125 धावांवर पंजाबला चौथा धक्का... जितेश शर्मा पाच धावा काढून बाद. कर्ण शर्माने काढला त्रिफाळा

पंजाबला तिसरा धक्का

रायली रुसो 61 धावांवर तंबूत परतला.  कर्ण शर्मानं घेतली विकेट... 

रायली रुसोचं अर्धशतक

रायली रुसोचं अर्धशतक...22 चेंडूत ठोकल्या 51 धावा

पंजाबला दुसरा धक्का

लॉकी फर्गुसन यानं पंजाबला दिला दुसरा धक्का.. जॉनी बेयरस्टो 16 चेंडूत 27 धावांवर बाद झाला.

पंजाबला पहिला धक्का

पंजाबला पहिला धक्का... प्रभसिमरन पहिल्याच षटकात बाद

कॅमरुन ग्रीन 46 धावांवर बाद

कॅमरुन ग्रीन 46 धावांवर बाद

हर्षल पटेलचा भेदक मारा

लोमरोर याला हर्षल पटेलनं पाठवलं तंबूत.. 

दिनेश कार्तिक बाद

हर्षल पटेल यानं दिनेश कार्तिकला पाठवलं तंबूत... आरसीबीचा अर्धा संघ तंबूत

आरसीबीला चौथा धक्का

विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला चौथा धक्का बसलाय. विराट कोहली 92 धावांवर बाद झाला. शतक  फक्त 8 धावांनी हुकले. 

आरसीबीच्या 200 धावा फलकावर

विराट कोहली आणि कॅमरुन ग्रीन यांनी यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आरसीबीने 200 धावांचा पल्ला पार केला आहे.

पावसाची विश्रांती

पावसाने विश्रांती घेतली आहे. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल.

धर्मशालामध्ये जोरदार पाऊस

पंजाब-हैदराबाद सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय

पंजाब-हैदराबाद सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय आला आहे. आरसीबी 10 षटकानंतर 3 बाद 119 धावा

आरसीबीला तिसरा धक्का

रजत पाटीदारच्या रुपाने आरसीबीला तिसरा धक्का... सॅम करन यानं पाटीदारला पाठवले तंबूत

रजत पाटीदारचं शानदार अर्धशतक

रजत पाटीदारने 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. आरसीबीची भक्कम सुरुवात

सहा षटकाचा खेळ संपला

सहा षटकानंतर आरसीबीनं दोन विकेटच्या मोबदल्यात 56 धावा केल्या आहेत. विराट कोहली 22 धावांवर खेळत आहे. तर रजत पाटीदार 13 धावांवर खेळत आहे. फाफ डु प्लेलिस 9 तर विल जॅक्स 12 धावांवर बाद झालाय.

आरसीबीला दुसरा धक्का

विल जॅक्सच्या रुपाने आरसीबीला दुसरा धक्का बसला आहे. 7 चेंडूत 12 धावा... आरसीबी 2 बाद 42 धावा

आरसीबीला पहिला धक्का

कावेरप्पानं आरसीबीला दिला पहिला धक्का.... फाफ डु प्लेलिस स्वस्तात तंबूत परतलाय.

पंजाबने नाणेफेक जिंकली

पंजाबचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

धर्मशाला पंजाबसाठी अनलकी

पंजाब किंग्जच्या संघासाठी धर्मशालाचं मैदान अनलकी ठरलंय. पंजाबनं  इथं झालेल्या 12 मॅचपैकी केवळ  5 मॅचमध्ये विजय मिळवलाय. तर, त्यांना सात मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागलाय. 

जो संघ पराभूत होईल तो आयपीएलबाहेर जाणार

पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यापैकी जो संघ आज पराभूत होईल तो आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर जाईल. त्यामुळं दोन्ही संघ विजयाच्या इराद्यानं मैदानात उतरतील. 

शिखर धवन पंजाबच्या संघात परतणार? 

पंजाब किंग्जचा नियमित कॅप्टन शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळं आयपीएल मॅचेसपासून दूर आहे. त्याच्या ऐवजी सॅम करन पंजाबचं नेतृत्त्व करत आहे.

टॉस जिंकणारी टीम काय करेल? 

धर्मशालाच्या मैदानाचा विचार केला असता रात्रीच्या वेळी ड्यूचा प्रभाव जाणवतो.त्यामुळं टॉस जिंकलेली टीम पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेईल.

धर्मशाला मैदानावरील दुसरी मॅच 

धर्मशाला येथील मैदानावर यंदाच्या आयपीएलमधील दुसरी मॅच होत आहे. यापूर्वी पंजाब आणि चेन्नई सपर किंग्ज आमने सामने आले होते. आता पंजाब आणि आरसीबी समोरासमोर येणार आहेत.

पार्श्वभूमी

PBKS vs RCB Live Score Updates, IPL2024 : आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज णि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमने सामने येणार आहेत. दोन्ही संघांची यंदाच्या आयपीएलमधील कामगिरी फारशी समाधानकारक राहिलेली नाही. पंजाबनं विजयानं आयपीएलची सुरुवात केली होती. मात्र,त्यानंतर त्यांना कामगिरीत सातत्या राखता आलं नव्हतं. चेन्नईला त्यांच्या होम ग्राऊंडवर दिल्लीनं पराभूत केलं होतं. पंजाबनं आतापर्यंत 11 मॅच खेळल्या असून त्यात 7 मॅचमध्ये पराभव झालाय.  दुसरीकडे आरसीबीसाठी प्लेऑफच्या दृष्टीनं आजची मॅच महत्त्वाची आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.