हैदराबाद : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) नव्या कॅप्टनसह यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2024) सहभागी झाली आहे.मात्र, मुंबई इंडियन्सच्या टीमला अपेक्षित असं मिळताना दिसत नाही. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या अडचणी  काही कमी होत नसल्याचं चित्र आहे. गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरुद्ध च्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सला त्यांचा टी-20 क्रिकेटमधील हुकमी एक्का कधी फिट होणार याची प्रतीक्षा आहे. 


सूर्यकुमार यादव कधी फिट होणार? (Suryakumar Yadav )


डिसेंबर जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर सूर्यकुमार यादव क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल पूर्वी तो फिट होईल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र,आयपीएलमध्ये मुंबईच्या दोन मॅच झाल्यातरी सूर्यकुमार यादव अजूनही फिट झालेला नाही. मुंबईला पहिल्या दोन मॅचमध्ये सूर्यकुमार यादवची कमी जाणवली होती. गुजरात विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं 6 धावांनी तर हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये 31 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. सूर्यकुमार यादव मुंबईच्या टीममध्ये असल्यास वेगळं चित्र पाहायला मिलालं असतं. 
 
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगची ओपनिंग रोहित शर्मा आणि इशान किशन करतात. तिसऱ्या स्थानी तिलक वर्मा चांगली कामगिरी करत आहेत. हार्दिक पांड्या आणि टिम डेविड हे दोन फलंदाज सहाव्या सातव्या क्रमांकावर बॅटिंग करु शकतात. मुंबईला चौथ्या आणि पाचव्या स्थानावर चांगली कामगिरी करणाऱ्या बॅटसमनची कमी जाणवत आहे. मुंबईसाठी सूर्यकुमार यादव ही जबाबदारी  चांगल्या प्रकारे पार पाडत होता. 


सूर्यकुमार यादव कधी फिट होणार?


सूर्यकुमार यादव नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन थेरेपी घेत आहे. सूर्या गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचला मुकला आहे. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार सूर्यकुमार यादव राजस्थान रॉयल्स विरुद्ध  होणाऱ्या मॅचमध्ये देखील फिट होण्याची शक्यता कमी आहे. 


सूर्यकुमार यादवचं अनफिट असणं हार्दिक पांड्याचं देखील टेन्शन वाढवणार आहे. सूर्यकुमार यादव फिट न झाल्यास हार्दिक पांड्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं लागेल.  


मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन मॅचमध्ये विजय मिळाला नसला तरी आगामी मॅचेस होम ग्राऊंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. घरच्या मैदानावर मॅच होणार असल्यानं मुंबईच्या क्रिकेटच्या प्रेक्षकांचा पाठिंबा हार्दिक पांड्याच्या टीमला मिळू शकतो. पाचवेळा आयपीएल विजेतेपद पटकावणारी मुंबईच्या टीमला यावेळी सूर गवसलेला नाही.  तिसऱ्या मॅचमध्ये तरी मुंबई विजयाचं खातं उघडणार का हे पाहावं लागेल. 


संबंधित बातम्या : 


Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचे सलग दोन पराभव, आकाश अंबानींची रोहित शर्मासोबत चर्चा,मुंबईला सूर गवसणार


Hardik Pandya : हार्दिकच्या चुकांचा फटका, त्या निर्णयांची पोलखोल, मुंबईच्या दुसऱ्या पराभवानंतर पांड्या माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर