लखनौ: आयपीएलमध्ये (IPL 2024)  लखनौ सुपर जाएंटसनं (Lucknow Super Giants) यापूर्वीचा इतिहास बदल गुजरात टायटन्स (Gujarat Titans) ला पराभूत केलं आहे. लखनौ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 बाद 163 धावा केल्या. विजयासाठी 164 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या गुजरातनं सावध सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर लखनौच्या बॉलर्सनी लखनौच्या नियमित अंतरानं विकेट घेतल्या. यामुळं गुजरातला धावांचा पाठलाग यशस्वीपणे करता आला नाही. गुजरातकडून सर्वाधिक धावा साई सुदर्शननं केल्या. साई सुदर्शननं 31 धावा केल्या. लखनौनं गुजरातवर 33 धावांनी विजय मिळवला. गुजरातनं सर्वबाद 130 धावा केल्या.  


लखनौकडून कृणाल पांड्यानं तीन आणि यश ठाकूरनं पाच विकेट घेतल्या. याशिवाय रवी बिश्नोई आणि नवीन उल हकनं एक एक विकेट घेतली. लखनौ एक्स्प्रेस अशी ओळख असलेल्या मयंक यादवला आज एकही विकेट मिळाली नाही. तो जखमी झाल्यानं बॉलिंग करु शकला नाही. 


लखनौला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्स कडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर लखनौनं आरसीबी आणि पंजाब किंग्जला पराभूत केलं होतं. आज लखनौनं शुभमन गिलच्या नेतृत्त्वातील गुजरात टायटन्सला पराभूत केलं. 


गुजरातच्या फलंदाजांची हाराकिरी


गुजरातनं 163 धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली होती. साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी गुजरातला 54 धावांची सलामीची भागिदारी करुन दिली होती. मात्र, यश ठाकूरनं शुभमन  गिलला 19 धावांवर बाद केलं. यानंतर गुजरातचे फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकले नाहीत. नियमित अंतरानं ते बाद होत गेले आणि गुजरातनं जिंकणारी मॅच गमावली.  केन विल्यमन्सननं एक रन करुन बाद जाला. त्यानंतर साई सुदर्शननं 31 धावा केल्या. साई सुदर्शन वगळता गुजरातचा एकही फलंदाज साधा 20 धावांचा टप्पा पार करु शकला नाही. बीआर शरथ 2 धावा, विजय शंकर 17,  दर्शन नाळखंडे 12, राहुल तेवातिया   , उमेश यादवनं 2 धावा केल्या. 


गुजरात आणि लखनौ मॅचपूर्वी गुणतालिकेत अनुक्रमे 7 व्या आणि  चौथ्या स्थानावर होते. लखनौ सुपर जाएंटसनं आजच्या मॅचमध्ये विजय मिळवल्यानं ते 6 गुणांसह तिसऱ्या स्थानावर गेले आहेत. 


लखनौ सुपर जाएंटसच्या गोलंदाजांनी ही मॅच जिंकवून दिली आहे. यश ठाकूर, कृणाल पांड्या, रवि बिश्नोई आणि  नवीन उल हकनं गुजरातला 163 धावांच्या जवळपास पोहोचू दिलं नाही. 
 
लखनौ आणि गुजरात टायटन्स यांच्यात यापूर्वी झालेल्या चार मॅचमध्ये गुजरातचं वर्चस्व राहिलं होतं. गुजरातनं चारही मॅचमध्ये विजय मिळवला होता. के.एल. राहुलच्या नेतृत्त्वातील टीम आजच्या गुजरात विरुद्ध पहिला विजय मिळवला आहे.  


संबंधित बातम्या :


IPl 2024 Romario Shepherd : 4,6,6,6,4,6 शेफर्डच्या वादळात नॉर्खियाचा पालापाचोळा, पहिल्याच मॅचमध्ये मुंबईचे पैसे फिटले


LSG vs GT Toss Update : लखनौनं होम ग्राऊंडवर टॉस जिंकला, पहिल्यांदा बॅटिंग करणार, गुजरात कमबॅक करणार?