KL Rahul LSG IPL 2024 : केएल राहुल आणि लखनौचे मालक संजिव गोयंका यांच्यामध्ये सर्वकाही ठीक नसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु होत्या. याबाबत लखनौ सुपर जायंट्सचे सहाय्यक प्रशिक्षक लान्स क्लुजनर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यानंतर राहुल आणि संघाचे मावर संजीव गोएंका यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये गोयंका राहुलशी अत्यंत अयोग्य पद्धतीने बोलले होते, असा दावा केला जात होता. क्लुसनर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो की, दोन क्रिकेटप्रेमींमधील हे सामान्य संभाषण होते. राहुलच्या कर्णधारपदाबाबतही क्लुसनरनं माहिती दिली. 


इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, लान्स क्लुसनर म्हणाला, "मला वाटते की हे दोन क्रिकेटप्रेमींमधील संभाषण होते. आम्हाला ठोस आणि स्पष्ट संभाषण करायला आवडते. यामध्ये काही अडचण दिसत नाही. अशा संभाषणामुळे संघ अधिक चांगला, भक्कम होतो. आमच्यासाठी ही कोणत्याही प्रकारची मोठी गोष्ट नाही. राहुल चांगल्या ठिकाणी असून गेल्या अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.''






सनरायझर्स हैदराबादने साखळी सामन्यात लखनौचा वाईट पद्धतीने पराभव केला होता. या सामन्यानंतर गोयंका कर्णधार केएल राहुलवर चिडताना दिसले. त्यामुळे गोएंका सोशल मीडियावर ट्रोलही झाले होते. या प्रकरणानंतर राहुल संघाचे कर्णधारपद सोडू शकतो, राहुलनं लखनौचं कर्णधारपद सोडावं, अशा बातम्याही आल्या होत्या. मात्र, अद्याप असे काहीही झालेले नाही. महत्त्वाचं म्हणजे, केएल राहुल याच्याकडून याप्रकारावर कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही. दरम्यान, संजिव गोयंका यांनी केएल राहुल यांना घरी जेवणासाठी आमंत्रण केले होते. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली.







आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सनं केएल राहुलच्या नेतृत्वात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यामध्ये लखनौला 6 सामने जिंकता आले, तर सहा सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. लखनौचे 12 गुण आहेत. आता त्याचे दोन सामने बाकी आहेत. लखनौचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स संघासोबत होणार आहे. यानंतर अखेरचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना 17 मे रोजी होणार आहे. दिल्लीविरोधातील सामन्यानंतर लखनौचं प्लेऑफच समीकरण स्पष्ट होईल.