IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Match: कोलकाता नाइट रायडर्स अन् सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज पहिला क्वालिफायर

IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Match: भलीमोठी धावसंख्या रचण्यात तरबेज असलेल्या हैदराबादच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा चौकार - षटकारांचा वर्षाव होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

मुकेश चव्हाण Last Updated: 21 May 2024 10:44 PM
कोलकात्याची फायनलमध्ये धडक

हैदराबादचा आठ विकेटने पराभव करत कोलकात्याने फायनलमध्ये धडक मारली

कोलकात्याची शानदार सुरुवात

160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याने शानदार सुरुवात केली. गुरबाज आणि नारायण यांनी आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागिदारी केली.  गुरबाजने 14 चेंडूमध्ये 23 धावांची खेळी केली. तर नारायण याने 16 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. वेंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर सध्या खेळत आहेत. 9.4 षटकानंतर कोलकाता 2 बाद 100 धावा... कोलकात्याला विजयासाठी 62 चेंडूत 60 धावांची गरज

कोलकात्याची फलंदाजी सुरु

160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी कोलकात्याकडून गुरबाज आणि नारायण सलामीला उतरले आहेत.  नारायण याने आपल्या शैलीत फलंदाजी सुरु केली.

हैदराबादचा डाव 159 धावांत संपुष्टात

हैदराबादचा डाव 159 धावांत संपुष्टात आला. पॅट कमिन्स याने अखेरीस फटकेबाजी करत धावसंख्या सन्माजनक केली.

हैदराबादला नववा धक्का

भुवनेश्वर कुमारच्या रुपाने हैदराबादला नववा धक्का बसलाय. 

हैदराबादला आठवा धक्का

अब्दुल समदच्या रुपाने हैदराबादला आठवा धक्का बसलाय. हर्षिक राणाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात समद झेलबाद झाला. 

नारायणचा इम्पॅक्ट

सुनील नारायण याने अप्रतिम चेंडूवर सनवीर सिंह याचा काढला त्रिफाळा....  हैदराबादची फलंदाजी ढेपाळली... 

सावळा गोंधळ

राहुल त्रिपाठी 55 धावांवर धावबाद झाला... समद आणि त्रिपाठी यांच्यामध्ये धाव घेण्यावरुन गोंधळ.. रसेलची शानदार फिल्डिंग... हैदराबादला सहावा धक्का

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत 

हेनरिक क्लासेन याला वरुण चक्रवर्तीने पाठवले तंबूत... क्लासेन याने 21 चेंडूत 32 धावा केल्या. 

हैदराबादचा अर्धा संघ तंबूत 

हेनरिक क्लासेन याला वरुण चक्रवर्तीने पाठवले तंबूत... क्लासेन याने 21 चेंडूत 32 धावा केल्या. 

स्टार्कचा भेदक मारा

मिचेल स्टार्कने एकाच षटकात हैदराबादला दोन धक्के दिले.. नितीश रेड्डी याच्यानंतर शाहबाज अहमद यालाही बाद केले. हैदराबाद चार बाद 39 धावा

हैदराबादची फलंदाजी ढेपाळली, पॉवरप्लेमध्ये तिसरा फलंदाज तंबूत

मिचेल स्टार्कने नितीश रेड्डीला पाठवले तंबूत, हैदराबादला तिसरा झटका बसलाय

स्टार्कने उडवल्या ट्रेविस हेडच्या दांड्या

हैदराबादला दुसरा धक्का

अभिषेक शर्माच्या रुपाने हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. वैभव अरोराने अभिषेक शर्माला बाद केले.

हैदराबादला पहिला धक्का

मिचेल स्टार्कने पहिल्याच षटकात ट्रेविस हेडला पाठवलं तंबूत, कोलकात्याची शानदार सुरुवात

कोलकाता नाइट रायडर्सची प्लेइंग इलेव्हन-

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क. [इम्पॅक्ट सब: वैभव अरोरा]

सनरायझर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन-

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार),टी नटराजन , भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत  [इम्पॅक्ट सब: सनवीर सिंह, उमरान मलिक]

हैदराबादने नाणेफेक जिंकली

क्वालिफायर 1 च्या सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकात्याचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी उतरणार आहे. 

थोड्याच वेळात होणार सामन्याला सुरुवात

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील सामना होणार आहे. 

हैदराबादच्या समदची तुफान फटकेबाजी

हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी कोलकाताचा संघ सज्ज

प्ले ऑफचं वेळापत्रक

21 मे - कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, अहमदाबाद ( क्वालिफायर 1)
22 मे - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, अहमदाबाद ( एलिमिनेटर )
24 मे - क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ वि. एलिमिनेटर विजेता, चेन्नई ( क्वालिफायर 2)
26 मे - क्वालिफायर 1 मधील विजेता संघ वि. क्वालिफायर 2 विजेता, चेन्नई ( फायनल) 

साखळी सामन्यात केकेआरने हैदराबादचा केला होता पराभव-

कोलकाता नाइट रायडर्सने IPL 2024 मध्ये त्यांचा पहिला लीग सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळला. कोलकाताने हा सामना 4 धावांनी जिंकला होता. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केकेआरने 20 षटकात 7 बाद 208 धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबाद संघाने 20 षटकांत 204/7 धावा केल्या. आता क्वालिफायरमध्ये कोणता संघ कोणावर मात करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

प्ले ऑफच्या लढतीला आजपासून होणार सुरुवात

कोलकाता नाइट रायडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), सुनील नारायण, वेंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि मिचेल स्टार्क. [इम्पॅक्ट सब: वैभव अरोरा]

सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, नीतीश रेड्डी, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, विजयकांत व्यासकांत [इम्पॅक्ट सब: टी नटराजन]

कोलकाता विरुद्ध हैदराबाद हेड टू हेड

कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 26 आयपीएल सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये कोलकाताने मोठी आघाडी घेतली असून 17 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादला केवळ 9 सामने जिंकता आले आहेत. अशा स्थितीत आजच्या क्वालिफायर सामन्यातही केकेआर संघ हैदराबादवर वर्चस्व गाजवताना दिसतो.

क्वालिफायरसाठी राखीव दिवस नाही -

आयपीएल 2024 फायनलसाठी फक्त राखीव दिवस ठेवण्यात आलाय. प्लेऑफच्या इतर कोणत्याही सामन्यासाठी आयपीएलकडून राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. क्वालीफायर 1, एलिमेनेटर आणि क्वालिफायर 2 या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. पावसाचा व्यत्यय आला तर कमीत कमी पाच षटकांचा समाना होईल. जर पाच षटकांचा सामना होणार नसेल तर सुपर ओव्हर घेत निकाल लावला जाईल. जर सुपर ओव्हरही होत नसेल तर गुणतालिकेतील अव्वल स्थानावर असणाऱ्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल. 

IPL 2024 KKR vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ

ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (W), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (C), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, उमरान मलिक, मयंक मार्कंडे, राहुल त्रिपाठी, मयंक अग्रवाल, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग 

पार्श्वभूमी

IPL 2024 KKR vs SRH Qualifier 1 Match: आज कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. भलीमोठी धावसंख्या रचण्यात तरबेज असलेल्या हैदराबादच्या फलंदाजांकडून पुन्हा एकदा चौकार - षटकारांचा वर्षाव होण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.