IPL 2024 Final Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad: आयपीएल 2024 च्या हंगामातील अंतिम सामना आज रंगणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. चेन्नईतील चेपॉक मैदानावर भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघ तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. कोलकाता नाइट रायडर्सला त्यांच्या 12 वर्षांच्या जुन्या विक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.


10 वर्षांपूर्वी गौतम गंभीरच्या टीमने केला होता करिष्मा-


IPL 2012 मध्ये गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार होता. मात्र, आता गौतम गंभीर कोलकाता नाइट रायडर्सच्या मेंटरची भूमिका बजावत आहे. आयपीएल 2012 चा फायनल चेपॉक, चेन्नई येथे खेळला गेला. त्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने होते. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्ससमोर 191 धावांचे लक्ष्य होते. मात्र या संघाने मोठे लक्ष्य गाठले. कोलकाता नाइट रायडर्सकडून मनविंदर बिसलाने 48 चेंडूत 89 धावांची सर्वोच्च खेळी खेळली.


कोलकाता 10 वर्षांचा दुष्काळ संपवणार?


कोलकाता नाइट रायडर्सने 2012 मध्ये पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर कोलकाता नाइट रायडर्सने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2014 चे जेतेपद जिंकले. आयपीएल 2014 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. मात्र त्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सला यश मिळालेले नाही. केकेआरच्या शेवटच्या विजेतेपदाला जवळपास 10 वर्षे उलटून गेली आहेत, परंतु ते तिसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी पटकावण्यात अपयशी ठरले आहेत. तथापि, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सला त्यांचा 10 वर्षांचा दुष्काळ संपवणार का?, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


केकेआरचा पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश


कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरने पहिला क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला, तर हैदराबादने दुसरा क्वालिफायर जिंकून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. मागील हंगामात म्हणजेच 2023 च्या आयपीएलमध्ये दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले नव्हते.


केकेआरची संभाव्य इलेव्हन


रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.


सनरायझर्स हैदराबादची संभाव्य इलेव्हन


ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), एडन मार्कराम, नितीश कुमार रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन.






संबंधित बातम्या:


Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: हार्दिकच्या घटस्फोट प्रकरणात कृणाल पांड्याची एन्ट्री; नताशाच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष


IPL 2024 SRH VS RR: हैदराबादचा विजय होताच काव्या मारन नाचू लागली; धावत जाऊन त्याला पहिले मिठी मारली, पाहा Video