RCB vs CSK Faf du plessis catch : करो या मरोच्या सामन्यात आरसीबीने चेन्नईचा 27 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये स्थान मिळवलेय. सांघिक खेळाडूच्या जोरावर आरसीबीनं प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. या सामन्यात फाफ डू प्लेसिसने अद्भुत झेल घेण्याचा पराक्रम केलाय. फाफने हवेत झेपवत शानदार झेल घेण्याचा पराक्रम केलाय. नेटकऱ्यांच्या मते, हा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट झेल आहे. आरसीीने प्रथम फलंदाजी करताना 218 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल चेन्नईच्या फलंदाजांनी ठरावीक अतंराने विकेट फेकल्या. फिल्डिंग करताना आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं अप्रतिम झेल घेतलाय. फाफच्या झेलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. नेटकऱ्यांकडून या झेलचं तोंडभरुन कौतुक केले जातेय.
फाफ डू प्लेसिसचा अप्रतिम झेल -
आरसीबीने दिलेल्या 219 धावांच्या आव्हानाचा पाठलाग चेन्नईचे सुपर किंग्ज करत होते. हा सामना मोक्याच्या क्षणी पोहचला होता. दोन्ही संघाला समान संधी होती. 15 षटक घेऊन मोहम्मद सिराज आला होता, त्यावेळी डावखुरा मिचेल सँटनर स्ट्राईकवर होता. या षटकातील शेवटचा चेंडू सिराजने फुल टॉस टाकला. या चेंडूवर सँटनरने गॅपमध्ये चौकार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फाफ डू प्लेसिस मध्ये आला त्यामुळे त्याचा हा प्रयत्न फसला. फाफ डू प्लेसिलने हवेत उंच उडी मारत एका हाताने भन्नाट झेल टिपला. त्याच्या या भन्नाट झेलमुळे सँटनर फक्त तीन धावा करत माघारी परतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. आयपीएलकडूनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
पाहा डू प्लेसिसने घेतलेला भन्नाट झेल -
फाफ डू प्लेसिसने घेतलेला झेल पाहून संघातील सहकारी खेळाडूही अवाक झाले. अख्का संघ फाफकडे येऊन जल्लोष करत होता. दुसरीकडे चेन्नईच्या चाहत्यांना डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.
आरसीबीचा दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश -
आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 218 धावांचा डोंगर उभारला. आरसीबीकडून कर्णधार फाफ डू प्लेसिस यानं अर्धशतक ठोकले. विराट कोहली 47, रजत पाटीदार 41, कॅमरुन ग्रीन 38 यांनी महत्वाच्या खेळी केल्या. त्याशिवाय दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी अखेरच्या क्षणी चौकार आणि षटकारांचा पाऊश पाडला. मॅक्सवेलने 16 तर कार्तिकने 14 धावा वसूल केल्या. 2019 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार ऋतुराज स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर मिशेलही 4 धावांवर बाद झाला. रचीन रवींद्र याने एकट्याने लढा दिला. त्याने 61 धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला ठरवीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबे, सँटनर बाद झाले. अखेरीस जाडेजा आणि धोनीने फटकेबाजी केली, पण विजय मिळवून देऊ शकले नाहीत. आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.