IPL 2024 DC vs LSG: आज दिल्ली कॅपिटल्स अन् लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार सामना; पाहा संक्षिप्त आढावा
IPL 2024 Delhi Capitals vs Lucknow Super Giants: भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
दिल्लीचा लखनौवर 19 धावांनी विजय....
लखनौ आणि दिल्ली यांच्यातील सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. अखेरच्या षटकात लखनौला विजयासाठी सहा चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे.
मोक्याच्या क्षणी रवि बिश्नोई धावबाद झाला. लखनौला नववा धक्का.. अर्शद खानकडून एकाकी झुंज सुरुच
अर्शद खानकडून दिल्लीची गोलंदाजांची कत्तल... अर्शद खान यानं 25 चेंडूत ठोकलं अर्धशतक.. मोक्याच्या क्षणी अर्शदकडून झुंज... लखनौला विजयासाठी 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज
युद्वीरच्या रुपाने लखनौला आठवा धक्का बसलाय. सामना रोमांचक स्थितीमध्ये पोहचलाय. लखनौला विजयासाठी 18 चेंडूत 42 धावांची गरज
अर्शद खान याच्याकडून झंझावती फलंदाजी सुरु आहे. ईशांत शर्माची गोलंदाजी फोडून काढली. अर्शद 21 चेंडूत 40 धावांवर केळत आहे. युद्धवीर 14 धावांवर नाबाद आहे. लखनौला विजयासाठी 29 चेंडूत 42 धावांची गरज
कृणाल पांड्याच्या रुपाने लखनौला सातवा धक्का बसला आहे. पांड्याने 18 चेंडूत 18 धावा केल्या.
मोक्याच्या क्षणी निकोलस पूरन बाद.. लखनौला सहावा धक्का.. पूरनने 27 चेंडूत ठोकल्या 61 धावा
केएल राहुलपाठोपाठ लखनौचे फलंदाज एकामागोमाग एक तंबूत परतले. लखनौचा अर्धा संघ तंबूत परतलाय. पूरनची एकाकी झुंज सुरु आहे.
LSG vs DC Live Score : लखनौ सुपर जायंट्सने 6 षटकांत 4 गडी गमावून 59 धावा केल्या. निकोलस पुरन 11 चेंडूत 32 धावा करून खेळत आहे. तो चांगली फलंदाजी करत आहे. आयुष बडोनी 3 धावा करून खेळत आहे. लखनौला विजयासाठी 150 धावांची गरज आहे.
209 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच षटकात लखनौला मोठा धक्का बसलाय. केएल राुलला ईशांत शर्मानं केले बाद.. लखनौ एक बाद सात धावा
दिल्लीची 208 धावांपर्यत मजल.. स्टब्सचं अर्धशतक
स्टब्सचं शानदार अर्धशतक.. 22 चेंडूत ठोकलं अर्धशतक
ऋषभ पंतच्या रुपाने लखनौला चौथं यश.. नवीनच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झालाय.
अर्धशतक ठोकणारा अभिषेक पोरेल बाद.. दिल्लीला तिसरा धक्का... दिल्ली तीन बाद 136 धावा
केएल राहुल यानं शाय होप याचा शानदार झेल घेतला. होपने 27 चेंडूत 38 धावा केल्या. दिल्ली 8.3 षटकानंतर दोन बाद 94 धावा
अभिषेक पोरेल आणि शाय होप यांनी लखनौची गोलंदाजी फोडून काढली. दोघांनी शानदार फलंदाजी करत धावसंख्या वाढवली. अभिषेक पोरेल यानं 21 चेंडूत अर्धशतक ठोकले. होप 22 चेंडूत 31 धावांवर खेळत आहे. दिल्ली एक बाद 87 धावा
अरशदनं दिल्लीला दिला सर्वात मोठा धक्का.. जॅक मॅकगर्क याला शून्यावर पाठवलं तंबूत...
अभिषेक पोरेल, जेक फ्रेजर-मैकगर्क, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, गुलबदीन नैब, रसिख दार सलाम, मुकेश कुमार, कुलदीप यादव, खलील अहमद
केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, दीपक हुडा, निकोलस पूरन, क्रुणाल पांड्या, युद्धवीर सिंह चरक, अरशद खान, रवि बिश्नोई, नवीन-उल-हक, मोहसिन खान
लखनौनं नाणेफेक जिंकली, दिल्लीची प्रथम फलंदाजी
डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद
डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (w/c), कुमार कुशाग्रा, अक्षर पटेल, ट्रिस्टन स्टब्स, रसिक दार सलाम, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद , प्रवीण दुबे, सुमित कुमार, रिकी भुई, विकी ओस्तवाल, गुलबदिन नायब, ललित यादव, पृथ्वी शॉ, लिझाद विल्यम्स, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, यश धुल, स्वस्तिक चिकारा
केएल राहुल (w/c), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टोइनिस, कृणाल पंड्या, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृष्णप्पा गौथम, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, यश ठाकूर, युद्धवीर सिंग चरक , ॲश्टन टर्नर, मणिमरन सिद्धार्थ, अमित मिश्रा, देवदत्त पडिक्कल, अर्शिन कुलकर्णी, मोहसीन खान, काइल मेयर्स, मॅट हेन्री, प्रेरक मंकड, अर्शद खान, शामर जोसेफ
पार्श्वभूमी
IPL 2024 Delhi Capitals vs Lucknow Super Giants: आज लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) यांच्यात सामना होणार आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर हा सामना रंगेल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -