IPL 2024 CSK vs RR: राजस्थान रॉयल्स (RR) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारत 5 विकेट्सने हा सामना जिंकला. राजस्थानविरुद्धच्या विजयानंतर चेन्नईने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 42 धावा केल्या. तर रचिन रविंद्रने 27, डॅरिल मिचेलने 22, मोईन अलीने 10, शिवम दुबे 18,  रवींद्र जडेजा 5 आणि समीर रिझवीने 15 धावा केल्या. राजस्थानकडून रविचंद्रन अश्विनने 2 विकेट्स घेतल्या. तर युझवेंद्र चहल आणि नेंद्र बर्गरला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. चेन्नई आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja Wicket) विकेटची चर्चा रंगली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


नेमकं काय घडलं?


चेन्नई सुपर किंग्सच्या डावातील 15व्या षटकाची ही घटना आहे. 142 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने 15 षटकांत 4 गडी गमावून 116 धावा केल्या होत्या. 16 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या आवेश खानने पहिल्या 4 चेंडूत चार धावा दिल्या होत्या. कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा क्रीजवर होते. दरम्यान, पाचवा चेंडू जडेजाने थर्ड मॅनच्या दिशेने टोलावला. जडेजाला 2 धावा घ्यायच्या होत्या, पण गायकवाड धावला नाही. त्यामुळे जडेजा दुसऱ्या धावेसाठी अर्ध्या खेळपट्टीवर धावत आला तेव्हा त्याला घाईघाईने नॉन-स्ट्रायकिंग एंडकडे परतावे लागले. यष्टिरक्षक संजू सॅमसनने चेंडू स्टंपच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा जडेजा चेंडू आणि स्टंपच्या मध्ये आला. अंपायरने रिव्ह्यूसाठी सूचित केले, ज्यामध्ये असे आढळले की जडेजाने चेंडू स्टंपवर लागण्यासाठी अडथळा आणला. या कारणामुळे जडेजाला बाद घोषित करण्यात आले.


पाहा व्हिडीओ-






चेन्नई गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर-


आयपीएल 2024 प्ले ऑफच्या शर्यतीत अधिक चांगल्या स्थितीत येण्यासाठी चेन्नईसाठी राजस्थान रॉयल्सला पराभूत करणे खूप महत्वाचे होते. आता चेन्नई सुपर किंग्सचे 13 सामन्यांत 7 विजयानंतर 14 गुण झाले आहेत. संघाचा नेट रनरेट +0.528 झाला आहे. लीग टप्प्यातील चेन्नईचा शेवटचा सामना आरसीबीविरुद्ध असेल, ज्यातील विजयाने चेन्नईचे टॉप-4 मध्ये स्थान निश्चित होईल. चेन्नई आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.


संबंधित बातम्या:


IPL 2024: 'तुम्हाला 400 कोटी रुपये मिळाले तर...', केएल राहुलसाठी वीरेंद्र सेहवाग मैदानात, लखनौच्या मालकाला खडसावले!


ICC T20 WC 2024: टी 20 विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये कोणते 4 संघ पोहचणार?; युवराज सिंहने नावं जाहीर करुन टाकली!


चेन्नईने सामना गमावला, पण सर्वांना चीअरलीडरची पडली भुरळ; अभिनेत्रींना टक्कर देणारं सौंदर्य, पाहा Photo's