IPL 2024 Auction Updates: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) साठी मिनी लिलाव (IPL Auction) आज (मंगळवार, 19 डिसेंबर) दुबई येथे होणार आहे. हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये 215 अनकॅप्ड खेळाडूंसह एकूण 333 खेळाडूंवर बोली लावली जाईल. मात्र, या लिलावाच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे.


इंग्लंड संघाचा (England Cricket Team) स्टार लेगस्पिन अष्टपैलू खेळाडू रेहान अहमदने (Rehan Ahmed) आयपीएल (IPL 2024) लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. त्यांच्याशिवाय बांगलादेश संघाचे (Bangladesh Cricket Team) स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद (Taskin Ahmed) आणि शौरीफुल इस्लाम (Shoriful Islam) यांनीही आयपीएल लिलावातून आपली नावं मागे घेतली आहेत. 


पुढच्या वर्षी भारत दौऱ्यावर येणार रेहान 


ESPNcricinfo नुसार, मिस्ट्री स्पिन रेहानने शॉर्ट नोटीस दिल्यानंतर त्याचं नाव मागे घेतलं आहे. इंग्लंडचा संघ 22 ते 30 मे दरम्यान घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पण इंग्लंड बोर्डाकडून आलेल्या अधिकृत वक्तव्यानुसार, त्यांचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध असतील. 


इंग्लंडच्या क्रिकेट संघातील हॅरी ब्रूक, फिल सॉल्ट, ख्रिस वोक्स आणि आदिल रशीद यांचा लिलावात समावेश असलेल्या इंग्लंडच्या स्टार खेळाडूंमध्ये समावेश आहे. पण दरम्यान, 19 वर्षीय रेहाननं आयपीएल लिलावातून आपलं नाव मागे घेतलं आहे.


रेहानला पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर यायचं आहे. जानेवारीत इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर जर तो आयपीएल खेळला तर त्याला आणखी 2 महिने देशाबाहेर राहावं लागेल. पण रेहानने इतक्या लहान वयात इतकं दिवस घरापासून दूर राहावं, असं इंग्लंड बोर्डाला वाटत नाही. त्यामुळेच रेहाननं आपल नाव आयपीएलच्या लिलावातून मागे घेतल्याचं बोललं जात आहे. 


'या' कारणांमुळे दोन्ही बांग्लादेशी प्लेयर्सही IPL पासून दूर 


रेहानसोबतच बांगलादेशच्या स्टार वेगवान गोलंदाजांनीही आपलं नाव आयपीएलमधून मागे घेतलं आहे. बांगलादेशचे स्टार वेगवान गोलंदाज तस्किन अहमद आणि शौरीफुल इस्लाम यांनीही आयपीएल लिलावातून आपली नावं मागे घेतली आहेत. याचं कारण म्हणजे, बांगलादेशला मार्च आणि एप्रिलमध्ये घरच्या मैदानावर श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळायची आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाहीत. 


23 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी 
या लिलावासाठी दोन सहयोगी देशांतील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. IPL 2024 साठी सर्व 10 संघांमध्ये एकूण 77 खेळाडूंची आवश्यकता आहे. याचा अर्थ 333 निवडलेल्या खेळाडूंपैकी केवळ 77 खेळाडूंचा लिलाव होईल. 333 खेळाडूंच्या यादीत 23 खेळाडू आहेत ज्यांची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तर 13 खेळाडूंची मूळ किंमत 1.5 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय 1 कोटी, 50 लाख, 75 लाख, 40 लाख, 30 लाख आणि 20 लाख रुपयांची मूळ किंमत असलेल्या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे.


गुजरातकडे सर्वाधिक पैसा - 
आरसीबीच्या पर्समध्ये 23.25 कोटी रुपये शिल्लक आहेत. आरसीबीने 11 खेळाडू रिलिज केले तर कॅमरुन ग्रीनला ट्रेड केले. जोश हेजलवुड, वानिंदु हसरंगा, हर्षल पटेल, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेविड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल आणि केदार जाधव यांना आरसीबीने रिलीज केले.  सनराइजर्स हैदराबाद संघाकडे 34 कोटी रुपये शिल्लक आहेत. कोलकात्याकडे 32.7 कोटी शिल्लक आहेत. चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि मुंबईच्या संघाकडे अनुक्रम 31.4 कोटी, 29.1 कोटी, 28.95 कोटी आणि 17.75 कोटी शिल्लक आहेत. त्याशिवाय राजस्थानकडे 14.5 कोटी शिल्लक आहेत.