IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठीचा मिनी लिलाव काही तासांवर येऊन ठेपला आहे. मंगळवारी दुपारी आयपीएलचा लिलाव पार पडणार आहे. लिलावात अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे. तर काही खेळाडू अनसोल्ड राहू शकतात. अनुभवी आणि युवा खेळाडूंना घेण्यासाठी दहा संघामध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. दुबईत होणाऱ्या आयपीएल लिलावात कोण कोणते खेळाडू महागडे ठरु शकतात, याबाबत अनेक तर्क वितर्क लगावले जातात. पाहूयात कोण कोणते खेळाडू लिलावात महागडे ठरु शकतात, याबाबत...


मिचेल स्टार्क - 


मिचेल स्टार्क आठ वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक करतोय. 2015 पासून मिचेल स्टार्क आयपीएलमध्ये खेळला नाही. नुकताच झालेला विश्वचषकात मिचेल स्टार्कसाठी शानदार होता.  यंदाच्या लिलावात मिचेल स्टार्कचे नाव निश्चित मानले जातेय. डावखुऱ्या मिचेल स्टार्कवर पैशांचा पाऊस पडू शकतो. मिचेल स्टार्कची बेस प्राईज दोन कोटी रुपये इतकी आहे. लिलावात वेगवान गोलंदाजांवर मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. स्टार्कला बेस प्राईजपेक्षा पाचपट रक्कम मिळू शकते. 


रचिन रविंद्र - 


न्यूझीलंडच्या युवा रचिन रविंद्र याने यंदाच्या विश्वचषकात धावांचा पाऊस पाडला. फलंदाजीसोबत तो गोलंदाजीतही तरबेज आहे. त्यामुळे लिलावात रचिन रविंद्र महागडा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रचिन रविंद्र याने आपली बेस प्राईज 50 लाख रुपये इतकी ठेवली आहे. त्याला दहा पठ जास्त रक्कम मिळू शकते. 


शार्दूल ठाकूर - 


भारताचा अष्टपैलू शार्दूल ठाकूर मिनि आयपीएल लिलावात मालामाल होण्याची शक्यता आहे. कोलकाता संघाने त्याला रिलिज केले होते, त्यानंतर तो आता लिलिवात सामील होतोय. गोलंदाजीसह शेवटच्या षटकात फटकेबाजीसाठी शार्दूल ठाकूरला ओळखलं जाते. शार्दूलची बेस प्राईद दोन कोटी रुपये आहे.


जेराल्ड कोएत्जी -


जेराल्ड कोएत्जी याने यंदाची विश्वचषक स्पर्धा गाजवली. त्याने गोलंदाजीत प्रभावी मारा करत सर्वांचेच मन जिंकले. यंदाच्या लिलावात जेराल्ड कोएत्जी याच्यावर कोट्यवधीची बोली लागण्याची अटकळ व्यक्त केली जातेय. जेराल्ड कोएत्जी याने बेस प्राईज दोन कोटी ठेवली आहे.


हर्षल पटेल - 


भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यंदाच्या लिलावात सामील झालाय. त्याला आरसीबीने रिजिल केले होते. त्याने आपली बेस प्राईज दोन कोटी रुपये ठेवली आहे. हर्षल पटेल गोलंदाजीसोबत फलंदाजीही करु शकतो. हर्षेल पटेल स्लोअर चेंडू फेकण्यात तरबेज आहे. 


वानंदु हसरंगा


लंकेचा अष्टपैलू वानंदु हसरंगा याच्यावरही सर्वांच्या नजरा असतील. अरसीबीने त्याला रिलिज करत सर्वांनाच चकीत केले होते. आरसीबीसाठी हसरंगा यशस्वी ठरला होता, तरीही त्याला रिजिल करण्यात आले होते. तो फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीही करु शकतो. त्यामुळे हसरंगाला घेण्यासाठी चूरस पाहायला मिळू शकते.