Abishek Porel Profile: आयपीएल 2023 साठी दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतच्या (Rishabh pant) रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. संघ व्यवस्थापनाने पंतच्या जागी बंगालचा युवा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलचा (Abishek Porel)  समावेश केला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दिल्लीहून रुरकीला जात असताना कार अपघातात पंत जखमी झाला होता. त्यामुळे तो आयपीएल 2023 मध्ये खेळू शकणार नाही. आता त्याच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने अभिषेक पोरेलचा (Abishek Porel) समावेश केला आहे. आज आपण दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) या नवीन खेळाडू बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.


Abhishek Porel Delhi Capitals: कोण आहे अभिषेक पोरेल? (who is Abishek Porel)


अभिषेक पोरेल (Abishek Porel) हा बंगालचा (Bangal) युवा यष्टिरक्षक फलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करतो. यष्टिरक्षणाव्यतिरिक्त तो डावखुरा फलंदाज आहे. तो गेल्या वर्षी भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. 2022 मध्येच त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. त्याने रणजी करंडक पदार्पणात बडोद्याविरुद्ध अर्धशतक झळकावले होते. रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्येही त्याने अर्धशतक झळकावले होते. तो अतिशय प्रतिभावान खेळाडू मानला जातो. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग याने ऋषभ पंतच्या (Rishabh pant) रिप्लेसमेंटसाठी काही यष्टीरक्षकांच्या टेस्ट घेतल्या होत्या. त्यात अभिषेक पोरेलचाही (Abishek Porel) समावेश होता. त्यानंतर त्याचा दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) संघात समावेश करण्यात आला.


Abhishek Porel Delhi Capitals: अभिषेक पोरेलची क्रिकेट कारकीर्द


अभिषेक पोरेलला (Abishek Porel) क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. त्याने आतापर्यंत 16 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यात त्याने 695 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 6 अर्धशतके झळकावली. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 73 धावा आहे. अभिषेकने 3 लिस्ट ए सामन्यांमध्येही भाग घेतला आहे. या सामन्यांच्या एका डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली. ज्यात त्याने 54 धावा केल्या. याशिवाय त्याने 3 टी-20 सामने देखील खेळले आहेत. ज्यात तो 22 धावा करण्यात यशस्वी झाला. अभिषेक पोरेलला (Abishek Porel) अजिबात अनुभव नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. अशातच तो ऋषभ पंतला (Rishabh pant) संघात रिप्लेस करू शकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 


हेही वाचा : 


IPL 2023: तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी होमपीचवर खेळणार, 'या' 5 खेळाडूंवर असणार ट्रॉफी जिंकण्याची जबाबदारी