IPL 2023: इंडियन प्रीमियर लीग 31 मार्चपासून सुरू होत आहे. या लीगचा हा 16वा हंगाम असून आतापर्यंत रॉयल बंगळुरूच्या संघाने एकही विजेतेपद जिंकलेले नाही. 2016 मध्ये आरसीबी संघ फायनलमध्ये पोहोचला होता, पण अजूनही ट्रॉफी जिंकण्यापासून दूर आहे. नव्या हंगामात पुन्हा एकदा हा संघ चॅम्पियन बनण्यासाठी मैदानात उतरणार आहे.


तब्बल 3 वर्षानंतर आरसीबी घरच्या मैदानावर खेळणार


RCB बद्दल बोलायचे झाले तर हा संघ इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध करणार आहे.  मुंबई इंडियन्सविरुद्धचा हा सामना आरसीबी घरच्या मैदानावर एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळणार आहे. तब्बल 3 वर्षांनंतर आरसीबी संघ आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोर खेळणार आहे. तसेच आरसीबी त्यांचा शेवटचा साखळी सामना 21 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल. 16व्या हंगामबद्दल बोलायचे तर विराट कोहलीसह या खेळाडूंवर आरसीबीला पहिली ट्रॉफी मिळवून देण्याची जबाबदारी असेल.


विराट कोहली - विराट कोहली आशिया चषकापासून धमाकेदार फॉर्ममध्ये आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर त्याने तिन्ही फॉरमॅटमधील शतकांचा दुष्काळ संपवला आहे. त्याने अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत 186 धावांची इनिंग खेळली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराटवर आपल्या संघाला एकदा तरी चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी असेल.


फाफ डुप्लेसिस - फॅफ डुप्लेसिसने वर्षभरापूर्वी या संघाची जबाबदारी स्वीकारली होती. गेल्या मोसमात त्याने 31.20 च्या सरासरीने 468 धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 होती.


रजत पाटीदार - पहिल्या काही सामन्यांमध्ये पाटीदारच्या खेळण्याच्या संधींबाबत शंका असू शकते, परंतु गेल्या मोसमात त्याने आपल्या दमदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पाटीदारने गेल्या मोसमात खेळलेल्या 8 सामन्यात 55.50 च्या सरासरीने 333 धावा केल्या.


वानिंदू हसरंगा - गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज वानिंदू हसरंगा हा या संघाचा प्राण आहे. गेल्या मोसमातही त्याने 16 सामन्यात 26 विकेट घेतल्या होत्या.


रीस टोपली - पहिल्यांदाच आयपीएलचा भाग बनलेला इंग्लंडचा गोलंदाज रीस टोपली आरसीबीसाठी एक महत्वाचा खेळाडू ठरू शकतो. टोपलीने 22 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 22 विकेट घेतल्या आहेत. 


IPL 2023 चे काही नवीन नियम



  • निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.

  • यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.

  • नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.

  • फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.