Indian Premier League : आयपीएलच्या सोळाव्या हंगमातील पहिल्या दोन्ही सामन्यात दिल्लीचा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ अयपशी ठरला. पृथ्वीला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. लखनौविराधात बारा तर गुजरातविरोधात सात धावा काढून पृथ्वी तंबूत परतला.  पृथ्वी शॉ याच्या खराब कामगिरीनंतर त्याच्यावर क्रीडा तज्ज्ञांनी टीकास्त्र सोडलेय. पृथ्वी शॉ याच्या खराब टीम इंडियाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग हाही भडकला आहे. विरेंद्र सेहवाग याने पृथ्वीला शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाडकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे.  दरम्यान, खराब फॉर्ममुळे दोन वर्षांपासून पृथ्वी शॉ टीम इंडियाच्या बाहेर आहे. पृथ्वी शॉ याला टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी आपल्या कामगिरीत सातत्या राखण्याची गरज आहे. 


गुजरातविरोधात पृथ्वी शॉ मोहम्मद शामीच्या चेंडूवर बाद झाला. शामीच्या शॉर्ट चेंडूला सोडण्याऐवजी पृथ्वी शॉ याने पूल करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटवर न आल्यामुळे अल्जारी जोसेफ याच्याकडे झेल देऊन परतला. पृथ्वीच्या चुकीच्या फटक्यावरुनच विरेंद्र सेहवाग भडकला. त्याने पृथ्वी शॉ याला शुभमन गिल याच्याकडून शिकण्याचा सल्ला दिला. जर करिअरमध्ये पुढे जायचे असेल तर शुभमन गिल याच्याकडून पृथ्वीला शिकण्याची गरज असल्याचे सेहवाग म्हणाला. 


विरेंद्र सहवाग क्रिकबजसोबत बोलत होता. यावेळी बोलताना सेहवाग म्हणाला की, चुकीचा फटका मारत पृथ्वी अनेकदा बाद झाला आहे. पण त्याने आपल्या चुकातून अद्याप शिकला नाही तुम्ही शुभमन गिल याचे उदाहरण घ्या.. गिल आणि पृथ्वी अंडर १९ संघाचे सदस्य होते. शुभमन गिल याने स्वत:च्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. आज तो टीम इंडियाच्या तिन्ही फॉर्मेटचा सदस्य आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉ याला आयपीएलमध्येही संघर्ष करावा लागत आहे. शुभमन गिल अंडर १९ मध्ये पृथ्वीच्या नेतृत्वात खेळला होता, हेही विसरता कामा नये.. पण शुभमन गिल याने आपल्या फलंदाजीवर खूप मेहनत घेतली आहे. 


पृथ्वीला चांगली कामगिरी करावी लागेल - 


पृथ्वी शॉला आता आयपीएलमध्ये स्वतला सिद्ध करावे लागले. आयपीएलमध्ये पृथ्वीला धावांचा पाऊस पाडवा लागेल. ऋतुराज गायकवाड याने आयपीएलच्या एका हंगामात सहाशे धावा काढल्या होत्या. आताही तो भन्नाट फॉर्मात आहे. शुभमन गिलही स्वतला प्रत्येकवेळा सिद्ध करत असते.. पृथ्वी शॉ याला गिल आणि गायकवाड याच्याकडून कामगिरीत सातत्य कसे ठेवायचे हे शिकायला हवे.