IPL 2023, RR vs CSK : यशस्वी जायस्वालच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर राजस्थानने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात २०२ धावांचा डोंगर उभारला आहे. यशस्वी जायस्वालशिवाय ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी अखेरच्या षटकात आक्रमक फलंदाजी केली. चेन्नईला विजयासाठी २०३ धावांची गरज आहे.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी राजस्थानला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या सहा षटकात या दोघांनी ६४ धावांचा पाऊस पाडला. जोस बटलर याने संयमी फलंदाजी केली तर यशस्वी जायस्वाल याने आक्रमक फलंदाजी केली. जोस बटलर याने २१ चेंडूत २७ धावांचे योगदान दिलेय. या खेळीत बटलरने चार चौकार लगावले. रविंद्र जाडेजा याने बटलरला तंबूत पाठवले. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी ८६ धावांची भागिदारी केली.
यशस्वी जायस्वाल याने आक्रमक फलंदाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. राजस्थानचा सलामी फलंदाज यशस्वी जायस्वाल याने ४३ चेंडूत ७७ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये त्याने चार षटकार आणि ८ चौकार लगावले. यशस्वी जायस्वाल याने दमदार फलंदाजी केली. संजू सॅमसन आणि शिमोरन हेटमायर यांना मोठी खेळी करता आली नाही. संजू सॅमसन याने १७ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. तर शिमरोन हेटमायर याला दहा चेंडूत आठ धावा काढता आल्या. चार विकेट झटपट पडल्यानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांनी राजस्तानला १९० पार नेले.
ध्रुव जुरेल याने १५ चेंडूत ३४ धावांचे योगदान दिले. या खेळीत जुरेल याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. जुरेल याला धोनीने धावबाद केले. देवदत्त पडिक्कल आणि जुरेल यांनी पाचव्या विकेटसाठी २० चेंडूत ४८ धावांची भागिदारी केली. ही राजस्थानसाठी दुसरी मोठी भागिदारी ठरली. जायस्वाल-बटलर यांनी ८६ धावांची भागिदारी केली. तर जायस्वाल -संजू यांच्यात ३९ धावांची भागिदारी झाली होती. अखेरच्या षटकात देवद्दत पडिक्कल याने आक्रमक फलंदाजी केली. पडिक्कल याने १३ चेंडूत २३ धावांचा पाऊस पाडला. यामध्ये चार चौकारांचा समावेश होता.
चेन्नईचे गोलंदाजाची खराब कामगिरी -
पहिल्या चेंडूपासूनच राजस्थानच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी केली. आकाश सिंह याने दोन षटकात ३२ धावा खरच केल्या. तर तुषार देशपांडे याने चार षटकात ४२ धावा खर्च केल्या. तुषार देशपांडे याने दोन विकेट घेतल्या. मथिशा पथीराना याने चार षटकात ४४ धावा खर्च केल्या. मोईन अली याने दोन षटकात १७ धावा खर्च केल्या. महिश तिक्ष्णा आणि रविंद्र जाडेजा यांनी अचूक टप्प्यावर मारा केला. तिक्ष्णा याने चार षटकात २४ धावांच्या मोबदल्यात एक विकेट घेतल्या. रविंद्र जाडेजा याने चार षटकात ३२ धावा खर्च करत एक विकेट घेतल्या.