Kedar Jadhav Joins RCB : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात एकपाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त होत आहे. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू डेविड विली दुखापतग्रस्त झाल्यामुळे आयपीएलमधून बाहेर गेला आहे. आरसाबीने डेविड विलीची रिप्लेसमेंट जाहीर केली आहे. मराठमोळ्या केदार जाधवला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे. यंदाच्या हंगामात डेविड विली याने फक्त तीन सामने खेळले आहेत. या तीन सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या आहेत.
केदार जाधव यंदाच्या लिलावत अनसोल्ड राहिला होता. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. जिओ सिनेमासाठी केदार जाधव मराठीतून कॉमेंट्री करत होता. उर्वरित आयपीएल सामन्यासाठी केदार जाधवला आरसीबीन आपल्या ताफ्यात घेतलेय.
केदार जाधव याने २०१० मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने ९३ आयपीएल सामन्यात ११९६ धावा केल्या आहेत. केदार जाधव याआधीही आरसीबीचा संघाचा सदस्य होता. केदार जाधव याला आरसीबीने एक कोटी रुपयांना विकत घेतले होते. केदार जाधव याने आरसीबीसाठी सतरा सामने खेळले आहे. आरसीबीचा मध्यक्रम सध्या ढेपाळत आहे. त्यामुळे अनुभवी फलंदाजाला आरसीबीने आपल्या ताफ्यात घेतले आहे. आता केदार जाधव आरसीबीला उर्वरित सामन्यात बळकटी देतोय का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कार्तिकसारखे पुनरागमन करणार का?
केदार जाधव सध्या आयपीएलमध्ये समालोचन करत आहे. स्टार स्पोर्ट्सच्या मराठी वाहिनीसाठी केदार जाधव समालोचन करत होता. त्यादरम्यान त्याला आरसीबीने ताफ्यात बोलवले. गेल्यावर्षीही समालोचन करणाऱ्या दिनेश कार्तिक याने दमदार पुनरागमन केले होते. दिनेश कार्तिकप्रमाणेच केदार जाधव दमदार कामगिरी करणार का? अशी चर्चा सुरु आहे.
आरसीबीने यंदाच्या हंगामात सरासरी कामगिरी केली आहे. विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांचा अपवाद वगळता इतरांना लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. आरसीबीने आतापर्यंत आठ सामन्यात फक्त चार विजय मिळवले आहेत. कोलकात्याने आरसीबीला दोन वेळा हरवले... मध्यक्रम फ्लॉप ठरल्यामुळेच आरसीबीला चार सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळेच आरसीबीने केदार जाधव याला ताफ्यात घेतलेय. केदार जाधव याचा अनुभव आरसीबीच्या फलंदाजीला बळकटी देईल.