DC vs RCB, IPL 2023 : विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांच्या अर्धशतकाच्या बळावर आरसीबीन निर्धारित 20 षटकात 181 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीकडून मिचेल मार्श याने दोन विकेट घेतल्या. महिपाल लोमरोर याने नाबाद ५४ धावांची खेळी केली. दिल्लीला विजयासाठी 182 धावांची गरज आहे.


विराट कोहलीचे अर्धशतक


रनमशीन विराट कोहली याने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने पहिल्यापासूनच संयमी फलंदाजी करत आऱसीबीची धावसंख्या वाढवली. विराट कोहलीने आयपीएलमध्ये अर्धशतकाचे अर्धशतक झळकावले. त्याशिवाय आयपीएमध्ये सात हजार धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीने केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने आज पुन्हा एकदा अर्धशतक झळकावत आरसीबीच्या डावाला आकार दिला. विराट कोहलीने यंदाच्या आयपीएलमध्ये सहावे अर्धशतक झळकावले. विराट कोहलीने ४६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. या खेळीत विराट कोहलीने पाच चौकार लगावले. विराट कोहलीने पहिल्या विकेटसाठी कर्णधार फाफ डु प्लेसिससोबत ८२ धावांची भागिदारी केली. तर तिसऱ्या विकेटसाठी महिपाल लोमरोर याच्यासोबत अर्धशतकी भागिदारी केली. 


महिपाल लोमरोरचे अर्धशतक -


मॅक्सवेल आणि फाफ बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने विराट कोहलीची चांगली साथ दिली. विराट कोहली बाद झाल्यानंतर महिपाल लोमरोर याने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. महिपाल लोमरोर याने कार्तिकसोबत आरसीबीच्या डावाला आकार दिला. लोमरोर याने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक झळकावले. महिपाल लोमरोर याचे आयपीएलमधील हे पहिले अर्धशतक होय.. तीन षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने महिपाल याने अर्धशतक झळकावले. 



फाफची निर्णायाक खेळी - 


विराट कोहली आणि फाफ यांनी पहिल्या दोन षटकात सयंमी फलंदाजी केली. त्यानंतर फाफ डु प्लेसिस याने आक्रमक रुप धारण केले. विराट कोहलीने एक बाजू लावून धरली होती.. दुसऱ्या बाजूला फाफने आक्रमक फलंदाजी करत आरसीबीची धावसंख्या वाढवली. फाफ डु प्लेलिस याने ३२ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. यामध्ये फाफने एक षटकार आणि पाच चौकार लगावले. मिचेल मार्श याने फाफ डु प्लेसिस याची आक्रमक खेळी संपुष्टात आणली. मॅक्सेवल याला आज खातेही उघडता आले नाही. दिनेश कार्तिक याने नऊ चेंडूत ११ धावांचे योगदान दिले. यामध्ये एका षटकाराचा समावेश होय. अनुज रावत याने अखेरीस तीन चेंडूत नाबाद आठ धावांची खेळी केली.


दिल्लीची गोलंदाजी कशी राहिली?


दिल्लीकडून मिचेल मार्श याने सर्वाधिक विकेट घेतल्या. मिचेल मार्स याने तीन षटकात २१ धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. खलील अहमद आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. मकेश कुमार आणि खलील अहमद यांनी प्रति षटक दहा पेक्षा जास्त धावा दिल्या. कुलदीप यादवही महागडा ठरला.