Arshdeep Singh IPL 2023 : शनिवारी रंगतदार सामन्यात पंजाबने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. वेगवान गोलंदाज अर्शदीप पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. अर्शदीप याने डेथ ओव्हरमध्ये भेदक मारा केला. अर्शदीपच्या गोलंदाजीमुळेच मुंबईचा पराभव झाला. अर्शदीप याने अखेरच्या षटकात दोन चेंडूवर दोन फलंदाजांना त्रिफाळाचीत करत पंजाबला १३ धावांनी विजय मिळवून दिला. 


वानखेडे मैदानात झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत 8 गडी गमावत 214 धावा केल्या होत्या. मुंबईनेही अखेरच्या षटकापर्यंत झुंज दिली. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १६ धावांची गरज होती.. मैदानावर तिलक आणि टिम डेविड होते.. पंजाबकडून अर्शदीप गोलंदाजी करत होता.. या षटकात अर्शधीपने फक्त तीन धावा दिल्या.. त्याशिवा तिलक वर्मा आमि नेहर वढेरा यांना क्लीन बोल्ड केले. या दोन्हीवेला स्टम्प तुटला.. अर्शदीपच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर कौतक होत आहे. पंजाब संघाने अर्शदीपने स्टम्प तोडलेला फोटो पोस्ट करत मुंबईला डिवचण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांना टॅग करत पंजाब किंग्सने एक ट्विट केलं. यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना आम्हाला एका गुन्ह्याची नोंद करायची आहे असं लिहिलं होतं. दरम्यान मुंबई पोलिसांनीही पंजाबला भन्नाट उत्तर दिलं. "कायदा तोडला तर कारवाई केली जाईल, स्टम्प तोडल्यावर नाही," असं उत्तर मुंबई पोलिसांनी पंजाबला दिलं. 






पंबाज किंग्सच्या ट्वीटला रिल्पालाय करत मुंबई इंडियन्सच्या चाहत्याने पंजाबला जसाश तसे उत्तर दिले..  मुंबई पोलिसांना टॅगही केलेय. पंजाबला 15 वर्षापासून ट्रॉफी मिळेना, शोधून द्याला का? असे म्हणत पंजाबवर जहरी टीका केली आहे. मुंबई इंडियन्सच्या चाहत्याच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 


 






आयपीएलमध्ये एलईडी स्टम्प वापरले जातात. या एलईडी स्टम्पच्या एका सेटची किंमत 25 ते 35 लाखांच्या दरम्यान आहे. त्याची किंमत वेगवेगळ्या देशांमध्ये बदलते. अशा स्थितीत अर्शदीपने दोन चेंडूंवर बॅक टू बॅक तुकडे केल्याने आयपीएलला किमान 50 ते 70 लाखांचे नुकसान झाले आहे. सामन्याच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीपने तिलक वर्माची पहिल्यांदा स्टम्प गुल केली. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराचा त्याच मार्गाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या बॅक टू बॅक विकेट्सने पंजाबने मुंबईच्या (PBKS vs MI) तोंडचा हिरावला. या सामन्यात पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला.