IPL 2023 Playoffs, All You Need to Know : आयपीएलच्या सोळाव्या हंगाम अखेरच्या टप्प्यात आलाय. तब्बल 52 दिवसांपासून 10 संघामध्ये मैदानावर लढत सुरु होती. 70 सामन्यानंतर प्लेऑफचे चित्र स्पष्ट झालेय. गुजरात, चेन्नई, लखनौ आणि मुंबई या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. उर्वरित सहा संघाना प्लेऑफमध्ये पोहचण्यात अपयश आलेय. 23 मे पासून प्लेऑफच्या लढतीला सुरुवात होणार आहेत. गुजरात आणि चेन्नई यांच्यात क्वालिफायरल 1 चा सामना होणार आहे. तर लखनौ आणि मुंबई या संघामध्ये एलिमेनटर सामना होईल.. 28 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर फायनलचा थरार रंगणार आहे.


IPL 2023, Qualifier 1 चेन्नई अन् गुजरातमध्ये लढत -


धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई आणि हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात यांच्यामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. गुजरातने सलग दुसऱ्यावर्षी प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर चेन्नईने आतापर्यंत सर्वाधिकवेळा क्वालिफाय मध्ये प्रवेश केलाय. मंगळवारी, 23 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर गुजरात आणि चेन्नई यांच्यामध्ये क्वालियाफाय 1 सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. चेन्नई घरच्या मैदानावर हार्दिक पांड्यासोबत दोन हात करणार आहे. यामधील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.  क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ ELIMINATOR मधील विजेत्या संघासोबत क्वालिफायर 2 मध्ये सामना खेळेल. 


लखनौ-मुंबई यांच्यातील ELIMINATOR  कधी कुठे होणार सामना ?
 
बुधवारी, 24 मे 2023 रोजी चेपॉक स्टेडिअमवर लखनौ आणि मुंबई यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता सामना रंगणार आहे. विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश करेल.  लखनौ संघ 17 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर मुंबईचा संघ 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. मुंबईने 14 सामन्यात 16 गुणांची कमाई केली आहे.



फायनलचा थरार कधी अन् कुठे ?


चेन्नई आणि गुजरात यांच्यातील पराभूत संघाला एक संधी मिळणार आहे. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ क्वालिफायर 2 मध्ये पोहचेल... त्याचा सामना ELIMINATOR  मधील विजेत्या संघासोबत होणार आहे. 26 मे 2023 रोजी क्वालिफायर 2 चा सामना रंगणार आहे. तर 28 मे रोजी फायनलचा थरार होईल. क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 मधील विजेते संघ फायनलमध्ये दोन हात करतील... क्वालिफायर 1 आणि ELIMINATOR  हे दोन सामने चेन्नई येथे होणार आहेत.. तर क्वालिफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर होणार आहेत. फायलचा थरार 28 मे रोजी होणार आहे. 


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?
आयपीएल 2023 प्लेऑफच्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.