IPL 2023 Playoff Qualifier : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या प्लेऑफसाठी चार संघ पात्र ठरले आहेत. मुंबई इंडियन्स (MI) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील प्लेऑफची शर्यत फारच रोमांचक होती. पण आरसीबीचा संघाला गुजरातकडून पराभवाचा सामना करावा लागला झाला. यामुळे मुंबई इंडियन्स 16 गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. आरसीबीला 16 गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी होती आणि त्यांचा रन रेटही मुंबईपेक्षा चांगला होता पण तसे होऊ शकले नाही. या मोसमात, गतविजेता गुजरात टायटन्स हा सोळाव्या हंगामात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. गुजरातने त्यांच्या 14 पैकी 9 सामने जिंकले आणि 18 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावलं.
आयपीएल 2023 प्लेऑफचा रणसंग्राम, चार संघात लढत
चार वेळचा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुसऱ्या स्थानावर होता. चेन्नईने 17 गुणांसह प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. लखनौ सुपर जायंट्सने देखील 17 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला असला तरी, रनरेटच्या बाबतीत ते चेन्नईपेक्षा मागे आहेत. लखनौ प्लेऑफमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, चौथा संघ मुंबई इंडियन्स ठरला. त्याने शेवटच्या साखळी सामन्यात सनरायझर्सला पराभूत करून प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
कोणता संघ किती वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला?
गतविजेत्या गुजरात टायटन्सच्या संघाने सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर चेन्नईने 12 व्या वेळा प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केलं आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने चार वेळा विजेतेपद पटकावलं आहे. याशिवाय लखनौ सुपर जायंट्सनेही सलग दुसऱ्यांदा प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. तर, प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याची मुंबई इंडियन्स संघाची ही नववी वेळ आहे.
प्लेऑफमध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार?
आयपीएल 2023 (IPL 2023) च्या प्लेऑफमध्ये आज, 23 मे रोजी पहिला क्वालिफायर सामना खेळला जाईल. पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात होणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातील विजयी संघ थेट अंतिम फेरीत स्थान मिळवेल. तर, पराभूत संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये आणखी एक संधी मिळेल. पहिल्या क्वालिफायरनंतर, 24 मे रोजी एलिमिनेटर सामना खेळला जाईल. एलिमिनेटर सामना लखनौ आणि मुंबई यांच्यात होणार आहे.
या सामन्यातील विजयी संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघाशी भिडणार आहे. दुसरीकडे, एलिमिनेटरमध्ये जो संघ हरेल, त्याचा प्रवास आयपीएल 2023 मध्ये तिथेच थांबेल, म्हणजेच तो लीगमध्ये चौथ्या स्थानावर असेल. अशा स्थितीत 26 मे रोजी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचा निर्णय होईल. यानंतर 28 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवला जाईल.
आयपीएल 2023 प्लेऑफ सामन्यांचं वेळापत्रक
गुजरात विरुद्ध चेन्नई, 23 मे, एम चिदंबरम स्टेडियम (क्वालिफायर-1)
लखनौ विरुद्ध मुंबई, 24 मे, एम चिदंबरम स्टेडियम (एलिमिनेटर)
TBC vs TBC, 26 मे, नरेंद्र मोदी स्टेडियम (क्वालिफायर-2)
आयपीएल 2023 अंतिम सामना, 28 मे, नरेंद्र मोदी स्टेडियम