PBKS vs RR Playing 11: IPL 2023 चा 66 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात धरमशाला येथे होणार आहे. याच मैदानावर झालेल्या गेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा दिल्ली कॅपिटल्सकडून 15 धावांनी पराभव झाला होता, तर राजस्थान रॉयल्सला आरसीबीविरुद्ध 112 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

Continues below advertisement

सध्या राजस्थान रॉयल्स 12 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. तर, पंजाब किंग्ज 12 गुणांसह आठव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत, परंतु दोन्ही संघ त्यांचा शेवटचा लीग स्टेज सामना जिंकून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायचा प्रयत्न करतील. अशातच कोणत्या खेळाडूंवर विश्वास ठेवून दोन्ही संघ त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देतील, हे जाणून घेऊया...  

PBKS vs RR IPL 2023: अशी असू शकते पंजाब विरुद्ध राजस्थान टीमची प्लेईंग-11 

पंजाब किंग्सचा संभाव्य संघ 

शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, सॅम करन, लियम लिविंगस्टोन, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), राहुल चाहर, हरप्रीत बरार, अर्शदीप सिंह, नाथन एलिस, कगिसो रबाडा

Continues below advertisement

राजस्थान रॉयल्सचा संभाव्य संघ 

यशस्वी जायस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), देवदत्त पाडिक्कल, केएम आसिफ, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युजवेंद्र चहल

PBKS vs RR Head To Head Record: जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत 25 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये राजस्थान रॉयल्सनं 14 तर पंजाब किंग्सनं 11 सामने जिंकले आहेत. त्यामुळे मागच्या रेकॉर्ड्सनुसार, राजस्थानचं पारडं पंजाबपेक्षा जड आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

काय सांगतो खेळपट्टीचा अहवाल? 

राजस्थान रॉयल्स पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यातील लढतीत दोन्ही संघ जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. पंजाबविरुद्धच्या विजयाचा फायदा राजस्थानला नक्की होईल. जर धरमशालाच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, या खेळपट्टीवर गोलंदाजांना खूप मदत मिळेल. या स्टेडियमची बाउंड्री लहान असल्यामुळे फलंदाज याचा फायदा नक्कीच घेताना दिसतील. त्यामुळे आजच्या सामन्या चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार हे मात्र नक्की.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

PBKS vs RR Pitch Report: धरमशालेत आज फलंदाज षटकारांचा पाऊस पाडणार की, गोलंदाजांची सरशी होणार? खेळपट्टीचा अहवाल जाणून घ्या