IPL 2023 MI vs PBKS : कर्णधार सॅम करनच्या वादळी अर्धशतकच्या जोरावर पंजाबने मुंबईसमोर २१५ धावांचे आव्हान ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २१४ धावांचा डोंगर उभारला. कर्णधार सॅम करन याने ५५ धावांची वादळी खेळी केली. तर  हरप्रीत सिंह भाटिया याने जबदरस्त 41 धावांचे योगदान दिले. मुंबईकडून पीयूष चावला याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.  



मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पंजाब किंग्सकडून प्रभसिमरन सिंह आणि मॅथ्यू शॉर्ट सलामीला उतरले होते. पण शॉर्ट लवकरच तंबूत परतला. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी फक्त 18 धावांची भागिदारी केली. कॅमरुन ग्रीन याने शॉर्ट याला ११ धावांवर तंबूत पाठवले. त्यानंतर मराठमोळ्या तायडेने प्रभसिमरनसोबत धावांचा पाऊस पाडला. पंजाबने सहा षटकात ५८ धावा केल्या. पण त्याचवेळी अर्जुन तेंडुलकरने प्रभसिमरनला २६ धावांव बाद केले. ६५ धावांवर पंजाबला दुसरा धक्का बसला. त्यानंर ८२ धावांवर लियम लिव्हिंगस्टोनही तंबूत परतला. लिव्हिंगस्टोननंतर अथर्व तायडेही लगेच बाद झाला... पीयूष चावलाने लिव्हिंगस्टोन आणि तायडे यांना तंबूचा रस्ता दाखवला.  


लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे पंजाबचा डाव ढेपाळला होता. पण त्याचवेळी कर्णधार सॅम करन आणि हरप्रीत भाटिया यांनी डावाला आकार दिला. दोघांनी वेगाने धावा जमवल्या.  १५ षटकांपर्यंत पंजाबने चार बाद ११८ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर पंजाबच्या फलंदाजांनी आक्रमक रुप धारण गेलेय. १६ वे षटक घेऊन आलेल्या अर्जुन तेंडुलकरच्या षटकात ३१ धावा वसूल केल्या. त्यानंतर १७ व्या षटकात १३ धावा वसूल केलया. १८ व्या षटकात हरप्रीत भाटिया बाद झाला.  ग्रीन याने हरप्रीतला बाद केले. पण त्या षटकात पंजाबने २५ धावा वसूल केल्या. सॅम करन आणि हरप्रीत भाटिया या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५० चेंडूत ९२ धावांची भागिदारी केली. त्यानंतर सॅम करन बाद झाला. सॅम करन याने चार षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने २९ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. 


सॅम करन बाद झाल्यानंतर अखेरच्या षटकात जितेश शर्माने षटकारांचा पाऊस पाडला. जितेश शर्माने सात चेंडूत चार षटकार लगावत २५ धावांची खेळी केली. पंजाबने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबद्लयात २१४ धावांपर्यंत मजल मारली. कॅमरुन ग्रीन आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर अर्जुन तेंडुलकर, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.