IPL 2023 New Rule Change : जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग म्हणजेच आयपीएलच्या (IPL) आगामी हंगामाला काही दिवसांत सुरुवात होत आहे. आयपीएल 2023 म्हणजेच 16 वा सीझन 31 मार्चपासून सुरु होत असून इतर सीझनपेक्षा हा सिजन वेगळा असणार आहे. आयपीएल 2023 मध्ये अनेक नवीन नियम समाविष्ट केले जात असताना आता एक मोठा नियम लागू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. साऊथ आफ्रिका लीगमधून घेतलेल्या या नियमानुसार आगामी हंगामात नाणेफेक पूर्ण झाल्यानंतर संघांना प्लेइंग इलेव्हनची घोषणा करण्याची मुभा देण्यात आली आहे. सद्यस्थितीला टॉस होताच त्याच ठिकाणी प्लेईंग 11 जाहीर करावी लागते. पण नवीन नियमामुळे संघाला नाणेफेकीच्या आधारावर त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये फेरबदल करण्याची संधी मिळाली आहे. BCCI ने इम्पॅक्ट प्लेयर नियमाव्यतिरिक्त नवीन हंगामासाठी केलेल्या अनेक नवीन नियमांपैकी हा एक आहे. 


ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने आयपीएल 2023 खेळण्याच्या अटींमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आयपीएल 2023 च्या नव्या नियमानुसार नाणेफेकीचा निकाल जाणून घेतल्यानंतर कर्णधारांना त्यांची संघ निवडण्याची परवानगी देण्यात आली आहे. “सध्या कर्णधारांना नाणेफेकीपूर्वी संघांची अदलाबदल करावी लागते. नाणेफेक झाल्यानंतर ताबडतोब संघांची देवाणघेवाण करण्यासाठी हे बदलण्यात आले आहे, ज्यामुळे संघ प्रथम फलंदाजी करत आहेत की गोलंदाजी करत आहेत यावर अवलंबून सर्वोत्तम इलेव्हन निवडू शकतात. हे संघांना प्रभावशाली खेळाडूची योजना आखण्यास मदत करेल,” क्रिकइन्फोनुसार आयपीएलच्या एका नोटमध्ये हे म्हटले आहे.


तसंच इम्पॅक्ट प्लेअरचा एक महत्त्वाचा नियमही आता लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, नाणेफेकीच्या वेळी संघाला त्यांच्या प्लेइंग इलेव्हनसह 4 पर्यायी खेळाडूंची नावे द्यावी लागतील. त्या 4 खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूचा कर्णधार सामन्यादरम्यान स्पेशल खेळाडू म्हणून वापर करू शकतो. ज्याला 'इम्पॅक्ट प्लेअर' असं म्हटलं जात असून हा खेळाडू म्हणून, कर्णधार 4 पर्यायी खेळाडूंपैकी कोणत्याही एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमधील कोणत्याही एका खेळाडूसह बदलू शकतो. रिटायर्ड हर्ट प्लेअरच्या जागी 'इम्पॅक्ट प्लेअर'ही बॅटिंगला येऊ शकतो. दोन्ही संघ प्रत्येक सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू वापरू शकतात. जर संघात 4 परदेशी खेळाडू खेळत असतील, तर विदेशी खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार नाही.


IPL 2023 चे काही नवीन नियम


निर्धारित वेळेबाहेरील प्रत्येक षटकासाठी 30-यार्ड वर्तुळाबाहेर फक्त चार क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे.
यष्टिरक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या चूकीच्या हालचालींमुळे डेड बॉल आणि 5 पेनल्टी रन्स मिळतील.
नाणेफेक झाल्यानंतर संघांनी प्लेईंग इलेव्हनची घोषणा करायची आहे.
फ्रँचायझी 15-खेळाडूंच्या टीम शीटचे नाव देतील, ज्यामध्ये 4 पर्यायांपैकी एक इम्पॅक्ट खेळाडू असेल.


हे देखील वाचा-