IPL 2023 Retention : आयपीएल 2023 (IPL 2023) आता काही महिन्यांवर आहे, ज्यामुळे आता लवकरच म्हणजे 23 डिसेंबरला आयपीएलचा लिलाव (IPl Auction) पार पडणार आहे. त्यापूर्वी सर्व संघांना 15 नोव्हेंबर म्हणजेच आजपर्यंत रिलीज केलेल्या आणि कायम अर्थात रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सुपूर्द करायची होती. ज्यानुसार सर्व संघानी आपली यादी जाही केली आहे. ज्यामुळे आता संघाकडे मिनी ऑक्शनपूर्वी ठरावीक रक्कम शिल्लक आहे. तर कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती रक्क शिल्लक आहे पाहूया...


1. सनरायजर्स हैदराबाद


सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज केलं आहे.


2. पंजाब किंग्स


दुसरीकडे पंजाब संघाने एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडे एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी लिलावात वापरता येणार आहे.


3. लखनौ सुपरजायंट्स


 मागील वर्षी उपांत्य फेरीत पोहोचलेल्या लखनौ सुपर जायंट्सने यावेळी काही खेळाडूंना सोडले असून त्यांची एकूण पर्स व्हॅल्यू 23.35 कोटी इतकी झाली आहे. संघात एकूण 4 विदेशी खेळाडूंचे स्थान शिल्लक आहे.


4. मुंबई इंडियन्स


आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही आयपीएल 2022 मध्ये मुंबईने अत्यंत खराब कामगिरी केली. त्यामुळे आता आगामी हंगामापूर्वी (IPL 2023) मुंबईने आपल्या संघात मोठे बदल केले आहेत. लिलावापूर्वी मुंबईने संघातील एकूण 13 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे मिनी ऑक्शनमध्ये मुंबईकडे 20.55 कोटी रुपये शिल्लक असणार आहेत.


5. चेन्नई सुपर किंग्स


चेन्नई संघाने ख्रिस जॉर्डन आणि अॅडम मिल्नेसारखे खेळाडू सोडले आहेत. आता टीमकडे एकूण 20.45 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे. त्याच वेळी, संघाकडे एकूण 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


6. दिल्ली कॅपिटल्स


दिल्ली कॅपिटल्सने शार्दुल ठाकुरला केकेआरला ट्रेड केलं आहे. ज्यानंतर त्यांच्याकडे 19.45 कोटी इतके रुपये शिल्लक आहेत. तर 2 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


7. गुजरात टायटन्स


आयपीएल 2022 जिंकणाऱ्या गुजरात टायटन्सने लॉकी फर्ग्यूसन आणि रहमनुल्ला गुरबाज यांना ट्रेड केलं आहे. ज्यानंतर टीमकडे एकूण 19.25 कोटी रुपए शिल्लक आहेत. तर 3 परदेशी खेळाडूंचे स्लॉट शिल्लक आहेत.


8. राजस्थान रॉयल्स


राजस्थान रॉयल्स संघाकडे खेळाडूंना रिलीज केल्यावर 13.20 कोटी इतकी पर्स वॅल्यू असून 4 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.


9. रॉयल चँलेंजर्स बंगळुरु


रॉयल चँलेंजर्स बंगळुरुकडे 8.75 कोटी रुपये शिल्लक असून 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहे.


10. कोलकाता नाईट रायडर्स


केकेआरने लॉकी फोर्ग्युसन, शार्दुल ठाकूर आणि रहमानउल्ला गुरबाज यांचा ट्रेडद्वारे संघात समावेश केला आहे. यानंतर, संघाकडे 7.05 कोटी रुपये शिल्लक आहेत, जे सर्व संघांमध्ये सर्वात कमी आहे. त्याचबरोबर संघात 3 विदेशी खेळाडूंचे स्लॉटही उपलब्ध आहेत. 


हे देखील वाचा-


IPL 2023 Retention : हैदराबाद-पंजाबचा दिग्गजांना धक्का, विल्यमसन-मयांकला केलं रिलीज, पाहा संपूर्ण यादी