IPL 2023 : आयपीएल (IPL 2023) स्पर्धेसाठी मिनी लिलाव (IPL 2023 Auction) 23 डिसेंबरला कोची इथे पार पडणार आहे. त्यापूर्वी आयपीएल संघांना आज अर्थात 15 नोव्हेंबरपर्यंत रिलीज आणि रिटेन केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयला द्यायची होती. दरम्यान यंदाचा मिनी ऑक्शन असूनही बऱ्याच संघानी मोठे मोठे बदल केल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स या संघानी त्यांचे आयपीएल 2022 मधील कर्णधारच रिलीज केले आहे. हैदराबादने केन विल्यमसनला तर पंजाबने मयांक अगरवालला रिलीज केलं आहे.
हैदराबाद संघाचा विचार करता केन विल्यमसनसह त्यांनी एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं आहे. ज्यामुळे आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधि म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. तर हैदराबादने रिटेन आणि रिलीज केलेले खेळाडू नेमके कोणते जाणून घेऊ...
सनरायझर्सने रिलीज केलेले खेळाडू
केन विल्यमसन, निकोलस पूरन, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, शॉन अॅबॉट, शशांक सिंग, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णू विनोद.
कोणते खेळाडू अजूनही हैदराबादमध्ये?
अब्दुल समद, एडन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन आणि उमरान मलिक.
पंजाबकडे 7.05 कोटी शिल्लक
दुसरीकडे पंजाब संघाने एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडे एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. पंजाबने अजून कोणत्याच खेळाडूला ट्रेडींगमधून संघाचा भाग बनवलेले नाही. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी लिलावात वापरता येणार आहे.
पंजाबनं रिलीज केलेले खेळाडू
मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोरा, बेनी हॉवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मंकड, संदीप शर्मा, हृतिक चॅटर्जी.
कोणते खेळाडू अजूनही पंजाबमध्ये?
शिखर धवन (कर्णधार), शाहरुख खान, जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा, राज बावा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व टायडे, अर्शदीप सिंग, बलतेज सिंग, नॅथन एलिस, कागिसो रबाडा, राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार .
हे देखील वाचा-