Suryakumar Yadav Century : सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या बळावर मुंबईने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात २१८ धावांचा डोंगर उभारलाय. सूर्यकुमार यादवने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सुरुवातीला संयमी खेळणाऱ्या सूर्याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. सूर्यकुमार यादव याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. ४९ चेंडूत सूर्यकुमार यादव याने १०३ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादवने ११ चौकार आणि सहा षटकार लगावले.
सूर्या दादा तळपला -
आरसीबीविरोधात जिथे खेळ थांबवला तिथूनच सूर्यकुमार याने फलंदाजी सुरु केली होती. रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादव याने ४९ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शतक करण्यासाठी सूर्यकुमार यादवला तीन धावांची गरज होती.. सूर्यकुमार यादव याने अल्जारी जोसेफ याला षटकार लगावत शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव याने सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने २०० धावांचा पल्ला पार केला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव याने आक्रमक फलंदाजी केली. सूर्यकुमार यादव याने पहिल्या ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढील १७ चेंडूत ५३ धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. त्याशिवाय मागील १२ वर्षात मुंबईसाठी शतक झळकावणारा सुर्यकुमार यादव पहिलाच फलंदाज आहे. रोहित शर्मानंतर मुंबईच्या फलंदाजाला शतक झळकावता आले नव्हते.
सूर्यकुमारच्या खेळीनंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडलाय. सूर्यकुमार यादव याच्या खेळीनंतर विराट कोहलीनेही ट्वीट करत कौतुक केलेय. सोशल मीडियावर सूर्यकुमार यादव याच्या खेळीचे कौतुक होत आहे.