IPL 2023, MI vs GT : गतविजेते गुजरात टायटन्स (GT) वानखेडेच्या मैदानावर आज पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध लढणार आहे.  यजमान मुंबईचा संघ पराभवाचा वचपा काढण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. गुजरातचा संघ संतुलीत दिसतोय.. पण मुंबईची गोलंदाजी कमकुवत जाणवत आहे. वानखेडे मैदानावर या दोन्ही संघातील लढत महत्वाची ठरणार आहे. या सामन्याती दोन्ही संघातील 11 खेळाडू कोणते असतील याची उत्सुकता शिगेला लागली आहे. 



दोन्ही संघाची गुणतालिकेतील स्थिती काय?
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. गुजरातने 11 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. गुजरातचा संघ 16 गुणांसह प्लोऑफच्या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. दुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबईते 11 सामन्यात 12 गुण आहेत. पाच वेळच्या विजेत्या मुंबईला पाच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. मुंबई गुणतालिकेत आघाडीच्या चार संघामध्ये आहे.


मागील पाच सामन्यात काय झाले ?
मागील पाच सामन्यात गुजरातने चार विजय मिळवले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने मागील दोन्ही सामन्यात विजय मिळवलााय. मुंबईचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रीककरण्याचा इरादा गुजरातचा असेल.  दुसरकडे मुंबईला मागील पाच सामन्यात तीन विजय मिळाले आहेत. नऊ मे रोजी मुंबईने वानखेडेवर आरसीबीचा पराभव केला होता. घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला असेल.


मुंबईची संभावित प्लेइंग 11 


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेविड, नेहल वढेरा, ऋतिक शौकीन, कॅमरून ग्रीन, पीयूष चावला, अरशद खान आणि ख्रीस जॉर्डन


गुजरात  संभावित प्लेइंग 11 


वृद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), अभिनव मनोहर, डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा 


मुंबई इंडियन्स टीम -


रोहित शर्मा (कर्णधार) कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.


गुजरात टायटन्स टीम -


हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.