IPL 2023 Points Table : कोलकात्याचा पराभव करत राजस्थानने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. राजस्थानने ईडन गार्डन्स मैदाावर कोलकाकात्याचा नऊ विकेटने सहज पराभव केला. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईचा संघ चौथ्या क्रमांकावर घसरलाय. ईडन गार्डन्सच्या मैदानावर राजस्थान रॉयल्सने कोलकात्याचा पराभव केला. या पराभवामुळे कोलकाताचे आव्हान संपुष्टात आलेय. कोलकात्याने दिलेले 149 धावांचे आव्हान राजस्थानने एका विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले.  या विजयासह राजस्थानने स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलेय. राजस्थानचा हा सहावा विजय होय.. या विजयासह राजस्थानने आघाडीच्या चार संघामध्ये स्थान पटकावलेय.


आघाडीचे चार संघ कोणते ?-


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. गुजराजने 11 सामन्यात आठ विजय मिळवले आहेत. 16 गुणासह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. आज मुंबईविरोधात गुजरातने विजय मिळवल्यास प्लेऑफमधील स्थान पक्के होईल. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या चेन्नई संघाचे  12 सामन्यात 15 गुण आहेत. चेन्नईने सात विजय मिळवलेत तर एक सामना अनिर्णित राहिलाय. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राजस्थान संघाचे 12 सामन्यात 12 गुण आहेत. तर मुंबईचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे. मुंबईचे 11 सामन्यात 12 गुण आहेत.  मुंबईपेक्षा राजस्थानचा नेटरनरेट चांगलाय.. त्यामुळे राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.  



बाकी संघाची काय स्थिती ?
 
राजस्थानच्या विजयानंतर लखनौचा संघ टॉप चारमधून बाहेर फेकला गेलाय. लखनौच्या संघाचे 11 सामन्यात 11 गुण आहेत. लखनौने पाच विजय मिळवलेत तर एक सामना टाय झाला होता. आरसीबीच्या संघाचे 10 गुण आहेत.. आरसीबीने 11 सामन्यात पाच विजय मिळवले आहेत.  कोलकाता संघाचेही 10 गुण आहेत. कोलकात्याचे 12 सामन्यात सात सामने गमावले आहेत. कोलकात्याचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय.



तळाला कोण कोण ?


कोलकाता आणि दिल्ली संघाचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. दिल्ली संघाने 11 सामन्यात सात सामने गमावले आहेत. त्यांचे आठ गुण आहेत. दिल्लीचा संघ दहाव्या स्थानावर आहे. नवव्या स्थानावर असणाऱ्या हैदरबादचे 10 सामन्यात आठ गुण आहेत. हैदराबादला प्लेऑफमध्ये स्थान पटकावाण्यासाटी उर्वरित सर्व सामन्यात विजय अनिवार्य आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील पंजाब संघ आठव्या क्रमांकावर आहे. पंजाबचे 11 सामन्यात दहा गुण आहेत. पंजाबच्या संघाचे पाच विजय आणि सहा पराभव झाले आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी पंजाबला सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल. पंजाबसह आरसीबीची अवस्थाही सारखीच आहे. आरसीबीचे 11 सामन्यात 10 गुण आहेत. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल.