MI vs GT, 1 Innings Highlights: सूर्यकुमार यादवच्या वादळी शतकाच्या बळावर मुंबईने निर्धारित २० षटकात पाच विकेटच्या मोबदल्यात २१८ धावांचा डोंगर उभारलाय. गुजरातकडून राशिद खान याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मुंबईला विजयासाठी २१९ धावांचे आव्हान आहे.


सूर्या दादा तळपला -


आरसीबीविरोधात जिथे खेळ थांबवला तिथूनच सूर्यकुमार याने फलंदाजी सुरु केली होती. रोहित शर्मा याने वादळी फलंदाजी करत शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादव याने ४९ चेंडूत १०३ धावांची खेळी केली. २० व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर शतक करण्यासाठी सूर्यकुमार यादवला तीन धावांची गरज होती.. सूर्यकुमार यादव याने अल्जारी जोसेफ याला षटकार लगावत शतक पूर्ण केले. सूर्यकुमार यादव याने सुरुवातीपासूनच गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. सूर्यकुमार यादव याच्या वादळी फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने २०० धावांचा पल्ला पार केला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सूर्यकुमार यादव याने आक्रमक फलंदाजी केली.  सूर्यकुमार यादव याने पहिल्या ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले.. त्यानंतर पुढील १७ चेंडूत ५३  धावा केल्या.  सूर्यकुमार यादव याने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले. 



ईशान-रोहितची दमदार सुरुवात - 
नाणेफेक गमावल्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशान यांनी मुंबईला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत पॉवरप्लेमध्ये चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडला. सहा षटकात ६१ धावांची सलामी दिली. पण त्यानंतर रोहित शर्मा आणि ईशान किशन लागोपाठ बाद झाले. ईशान किश याने २० चेंडूत ३१ धावांची योगदान दिले. या खेळीत एक षटकार आणि चार चौकाराचा समावेश होता. तर रोहित शर्माने १८ चेंडूत २९ धावांची खेळी केली.  या खेळीत रोहित शर्मा याने दोन षटकार आणि तीन चौकार लगावले. रोहित शर्मा आणि ईशान किशन यांना चांगली सुरुवात मिळाली होती.. या खेळीचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात त्यांना अपयश आले. 


चांगली सुरुवात, पण लगेच माघारी - 


नेहला वढेरा आणि विष्णू विनोद यांनी दमदार सुरुवात केली होती. दोघांनी चौकार आणि षठकारांचा पाऊस पाडला होता. पण त्यांना मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. नेहल वढेरा याने अवघ्या सात चेंडूत एका षटकारासह १५ धावांचे योगदान दिले. तर विष्णू विनोद याने वादळी फलंदाजीचे प्रदर्शन केले. विष्णू विनोद याने सूर्यकुमार यादवला चांगली साथ दिली. दोघांनी अर्धतकी भागिदारी केली. विष्णू विनोद याने २० चेंडूत ३० धावांचे योगदान दिलेय. यामध्ये दोन चौकार आणि दोन षटकाराचा समावेश होता. 



यांचा फ्लॉप शो - 


विस्फोटक टिम डेविड याला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने तीन चेंडूत पाच धावांचे योगदान दिले. 


राशिदकडे पर्पल कॅप - 


वानखेडे मैदानावर राशिद खान याने भेदक गोलंदाजी केली. राशिद खान याने अघ्या चार षटकात ३० धावांच्या मोबद्लयात चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यंदाच्या आयपीएलमध्ये राशिदच्या नावावर २३ विकेट झाल्या आहेत. राशिदने विकेटचा चौकार लगावत पर्पल कॅपवर नाव कोरलेय. युजवेंद्र चहल याला मागे टाकत राशिदने पर्पल कॅफवर नाव कोरले.


शमीची महागडी गोलंदाजी - 


मोहम्मद शमी आज सर्वात महागडा गोलंदाज ठरला. शमीला एकही विकेट घेता आली नाही अन् धावाबी रोखता आल्या नाहीत. मेहम्मद शमी याने चार षटकात ५३ धावा खर्च केल्या. त्याशिवाय मोहित शर्मा याने चार षटकात ४३ धावा खर्च केल्या आहेत. मोहित शर्मा याने एक विकेट घेतली. नूर अहमद  याने ३ षषटक ३८ धावा खर्च केल्या. राशिदचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. अल्जारी जोसेफ याने ५२ धावा खर्च केल्या.