Dhoni Stumping Viral : विकेटच्या मागे धोनीला अद्याप तोड मिळालेली नाही, यापुढे मिळणेही कठीण आहे.... असे का म्हटले जाते.. याचे उत्तर अनेकांना आयपीएलच्या फायनलमध्ये मिळाले असेल. धोनीने विकेटच्या मागे ज्या वेगाने स्टपिंग केली, त्याचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. एका सेंकदापेक्षा कमी वेळात धोनीने स्टपिंग केली. धोनीच्या स्टपिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गुजरातचे सलमी फलंदाज साहा आणि गिल झंझावती फलंदाजी करत होते. गिल तर भन्नाट फॉर्मात होता. शुभमन गिल याच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. त्यावेळी धोनीने आपल्या सर्वात विश्वासू गोलंदाजाच्या हातात चेंडू सोपवला. रविंद्र जाडेजाने पहिल्या दोन चेंडूवर गिल याची बॅट शांत ठेवली.. गिल याने पुढच्या चेंडूवर पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी रविंद्र जाडेजा याने गिलचा मानस ओळखला अन् चेंडूची दिशा बदलली. धोनीने त्याच वेगाने गिल याची स्टपिंग केली. चेंडू हातात आल्यानंतर धोनी याने अवघ्या 0.1 सेकंदात स्टपिंग केली. क्रिकेटच्या इतिहासात इतकी वेगवान स्टपिंग धोनीशिवाय अद्याप कुणीच केलेली नसेल. 41 वर्षीय धोनी युवा विकेटकिपरला लाजवेल अशी स्टपिंग करत आहे. धोनीच्या स्टपिंगचा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.
शुभमन गिल याचे वादळ शांत झाले -
यंदाच्या हंगामात शुभमन गिल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. गिल याने तीन शतकासह 800 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. अंतिम सामन्यातही गिलची बॅट धावांचा पाऊस पाडत होती. गिल याने 20 चेंडूत 39 धावांची खेळी केली. यामध्ये सात चौकाराचा समावेश होता. धोनी आणि जाडेजा यांच्या चपळाईमुळे गिल स्टपिंग बाद झाला. गिल याला तीन धावांवर जीवनदान मिळाले होते. त्यानंतर त्याने चौकाराचा पाऊस पाडला.
चेन्नईला 215 धावांचे आव्हान
IPL 2023 Final, GT vs CSK: साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे.