Sandeep Sharma IPL 2023 : राजस्थानने चेन्नईला घरच्या मैदानावर तीन धावांनी मात दिली. अखेरच्या चेंडूवर चेन्नईला विजयासाठी पाच धावांची गरज होती. स्ट्राईकवर एमएस धोनी होता...त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांना विजयाच्या आशा होत्या. पण राजस्थानच्या संदीप शर्मा याने अचूक टप्प्यावर चेंडू टाकत धोनीला षटकार अन् चौकार मारु दिला नाही. संदीप शर्मा याचे सध्या सोशल मीडियावर कौतुक होत आहे. जगातील नंबर एक फिनिशरला षटकार ठोकू न देणारा संदीप शर्मा आहे तरी? 


अखेरच्या षटकात चेन्नईला 21 धावांची गरज - 
चेन्नईला अखेरच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज होती. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन याने चेंडू संदीप शर्माकडे सोपवला.. समोर धोनी आणि जाडेजा यासारखे धुंरधर होते... पहिल्या तीन चेंडूवर संदीप शर्मा दबावात दिसला... धोनीने पहिल्या तीन चेंडूमध्ये संदीप शर्मा याला दोन षटकार लगावत चेन्नईच्या विजयाच्या आशा उंचावल्या.. पण अखेरच्या तीन चेंडूवर संदीप शर्मा याने जबरदस्त कमबॅक केले. 


धोनीला रोखले - 


समोर धोनीसारखा फिनिशर असेल तर जगातील कोणताही गोलंदाज दबावात जातो... पण संदीप शर्मा दबावात गेला नाही अथवा नर्वसही झाला नाही. अखेर चेंडूवर विजयासाठी पाच धावांची गरज असताना संदीप शर्मा याने अचूक टप्प्यावर यॉर्कर फेकला... धोनीला त्या चेंडूवर फक्त एक धाव घेतला आली. हा सामना राजस्थानने तीन धावांनी जिंकला... त्यानंतर संदीप शर्माच्या गोलंदाजीचे कौतुक होऊ लागले.. धोनीला अखेरच्या चेंडूवर षटकार मारु न देणाऱ्या संदीप शर्माबद्दल गुगलवर सर्च केले जातेय. पाहूयात कोण आहे संदीप शर्मा...?


कोण आहे संदीप शर्मा ? (Who Is Sandeep Sharma)


संदीप शर्मा मूळचा पंजाबचा खेळाडू आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पटियाला येथे बलविंदर शर्मा आणि नैना वटी यांच्या येथे झाला होता. संदीप शर्मा याला सुरुवातीला फलंदाज व्हायचे होते.. पण कोचने त्यांना गोलंदाज होण्याचा सल्ला दिला.. संदीप शर्मा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतो. 


आयपीएल 2023 मध्ये अनसोल्ड 


आयपीएल 2023 च्या आधी झालेल्या लिलावात संदीप शर्मा याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. संदीप शर्मा लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्याने आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा सोडून दिली होती. पण नशिबाने त्याला साथ दिली. प्रसिद्ध कृष्णा दुखापतग्रस्त झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सने संदीप शर्मा याला ताफ्यात घेतले. 





 
2013 पासून आयपीएलचा भाग 


संदीप शर्मा 2013 पासून आयपीएलमध्ये खेळतोय. त्याला सर्वात आधी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने खरेदी केले होते. संदीप शर्मा याने आतापर्यंत 106 आयपीएल सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 116 विकेट घेतल्या आहेत. तो अखेरच्या षटकात गोलंदाजीसाठी ओळखला जातो. राजस्थानच्या आधी तो पंजाब आणि हैदराबाद संघाचा भाग राहिलाय. संदीप शर्मा याने आयपीएलमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंना बाद केलेय, यामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. 


टीम इंडियाचाही सदस्य - 


संदीप शर्मा अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा सदस्य होता. संदीप शर्माच्या भेदक माऱ्यामुळे टीम इंडियाने 2012 मध्ये अंडर 19 चा वर्ल्ड कप जिंकला होता. संदीप शर्मा याने सिनिअर टीम इंडियाकडूनही दोन सामने खेळले आहेत. 2015 मध्ये झिम्बॉम्बेविरोधात तो भारतीय संघाचा सदस्य होता. या दोन सामन्यात संदीपला भेदक मारा करता आला नव्हता. त्याला दोन सामन्यात फक्त दोन विकेट घेता आल्या होत्या. त्यानंतर त्याला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. तो टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.