IPL 2023 Final Ticket : आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील फक्त दोन सामने शिल्लक आहेत. क्वालिफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहेत. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईचा संघ फायनलमध्ये पोहचलाय. तर मुंबई आणि गुजरात यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे. यातील विजेता संघ चेन्नईबरोबर होणार आहे. 26 मे रोजी क्वालिफायर तर 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. या सामन्यासाठी मोठ्या प्रणात चाहत्यांचा प्रतिसाद दिसतोय. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअबाहेर तिकिटासाठी तुडुंब गर्दी झाली होती. लोकांचा रोष पाहाक सुरक्षेसाठी उपस्थित असलेले पोलिसही हतबल झाले होते. 


अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमबाहेरील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. तुडवातुडवी, चेंगराचेंगरी अन् एकमेंकाच्या अंगावर चढून तिकिट घेण्यासाठी लोक जात असल्याचे दिसत आहे. महिलांचीही पर्वा करत नसल्याचे दिसत आहे. गर्दीचा रोष पाहाता पोलीसही शांत उभे असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. क्वालिफायर 2 आणि फायनलचे सामने अहमदाबाद येथीन स्टेडिअमवर होणार आहेत. चेन्नईने फायनलमध्ये प्रवेश केलाय. तर गुजरात आणि मुंबई यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. हे निर्णायक सामने पाहण्यासाठी चाहते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी तिकिट खरेदी करण्यासाठी एकच गर्दी करण्यात आली. 


पाहा व्हिडीओ






अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या आहेत.  उकाडा आणि उन्हाचा चाहत्यांवर कोणताही परिणाम झाला नाही, लांबच लांब रांगा दिसत आहेत.  ऑफलाईन प्रमाणे अनेकजणांनी ऑनलाईन तिकिट खरेदी केली आहेत. क्वालिफायर 2 आणि फायनल सामन्यासाठी तिकिटाची किंमत 800 रुपयापासून सुरु होते.. सर्वात महागडे तिकिट 10 हजार रुपये इतके आहे.