Deepak Chahar On MS Dhoni : आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यापासून धोनी फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतोय. पण प्रत्येक आयपीएलवेळी धोनी निवृत्त होणार अशा चर्चेला उधाण येते. आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे, त्यापूर्वीच धोनी आयपीएलनंतर निवृत्त होणार असल्याच्या बातम्यांचा ऊत आला होता. पण या आयपीएलनंतर धोनी निवृत्त होण्याची शक्यता कमी आहे. कारण चेन्नईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर याने तशी हिंट दिली आहे. 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपक चाहर याने धोनी यापुढेही खेळत राहणार असल्याची हिंट दिली आहे. चाहर म्हणाला की, '2023 आयपीएलमध्ये धोनीला खेळताना शेवटचे पाहू, याची गॅरेंटी नाही. ' 2022 मध्ये धोनीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्याता आला होता, तेव्हा तो म्हणाला होता की, नक्कीच खेळत राहिल. 

धोनी पुढील आयपीएलही खेळणार?चाहर म्हणाला की, धोनीचे हे अखेरचं आयपीएल असेल असे कुणीही म्हटले नाही. धोनी आणखी खेळेल, अशी आशा आहे. धोनीच्या निवृत्तबाबत आम्हाला कोणताही माहिती नाही. त्याला जितके खेळायचे तो खेळत राहिल.

धोनीच्या नेतृत्वात खेळणं माझे सौभाग्य

दीपक चाहर 2018 पासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा सदस्य आहे. चाहर म्हणाला की, 'धोनीला माहित आहे कधी निवृत्ती घ्यायची. कसोटी आणि नंतर एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्ती घेतल्याचे आपण पाहिलेय. त्यामुळे धोनीला जेव्हा वाटेल तेव्हा तो आयपीएलमधून निवृत्ती घेईल. मला आशा आहे की तो यापुढेही खेळत राहिल. धोनीच्या नेतृत्वात खेळणं माझे सौभाग्य आहे. धोनी सध्या चांहल्या लयीत आहे, यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजी करताना पाहा...'

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी आयपीएल 2023 ची तयारी करत आहे. 31 मार्चपासून आयपीएलच्या आगामी हंगामाला सुरुवात होणार आहे.  चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. पाहा चेन्नईचे संपूर्ण वेळापत्रक.... 

31 मार्च 2023- चेन्नई सुपर किंग्स vs गुजरात टायटंस- नरेन्द्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद2 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स- चेपक स्टेडियम, चेन्नई8 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, वानखेडे स्टेडियम, मुंबई12 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsराजस्थान रॉयल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई17 एप्रिल  2023- चेन्नई सुपर किंग्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर

21 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vsसनराइजर्स हैदराबाद, चेपक स्टेडियम, चेन्नई23 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, ईडेन गार्डेन स्टेडियम, कोलकाता27 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs राजस्थान रॉयल्स, जयपुर30 एप्रिल 2023- चेन्नई सुपर किंग्स vs पंजाब किंग्स, चेपक स्टेडियम, चेन्नई4 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs लखनऊ सुपर जॉइंट्स, इकाना स्टेडियम, लखनऊ

6 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स, चेपक स्टेडियम, चेन्नई10 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, चेपक स्टेडियम, चेन्नई14 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs कोलकाता नाइट राइडर्स, चेपक स्टेडियम, चेन्नई20 मे 2023- चेन्नई सुपर किंग्स vs दिल्ली कॅपिटल्स, अरूण जेटली स्टेडियम, दिल्ली