Mumbai Indians vs Delhi Capitals, Irfan Pathan : मंगळवारी मुंबईने अखेरच्या चेंडूवर दिल्लीचा सहा विकेटने पराभव केला. या सामन्यात दिल्लीने 172 धावांपर्यंत मजल मारली होती. डेविड वॉर्नर याने अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. पण वॉर्नरच्या संथ फलंदाजीबद्दल अनेकांनी टीका केली आहे. भारताचा माज क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही वॉर्नरच्या संथ खेळीवर नाराजी व्यक्त केली.  इरफान पठणा याने वॉर्नरच्या संथ खेळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेय. त्याशिवाय स्ट्राइक रेटही खराब असल्याचे म्हटले... इरफान पठाण याने ट्वीट करत आपले मत व्यक्त केले. त्यानंतर नेटकऱ्यांमध्ये ट्वीटरवॉरला सुरुवात झाली. काही इरफानच्या बाजूने होते, तर काहींनी इरफानवर टीका केली.


भारताची माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने डेविड वॉर्नरच्या फलंदाजीवर ट्वीट केले. वॉर्नरने मुंबईविरोधात ४७ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यावर इरफान पठाण चांगलाच भडकलेला दिसला.  पठाण याने वॉर्नरच्या संथ फलंदाजीबाबत ट्वीट करत म्हटले की, ‘ डेविड वॉर्नर खूप दिवसांपासून कमी स्ट्राईक रेटने धावा काढत आहे. त्याच्या स्ट्राईक रेटकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही. ’. इरफान पठाण याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर दोन गट पडले. एक वॉर्नरच्या सपोर्टमध्ये होता तर दुसरा वॉर्नरच्या फलंजाजीवर टीका करणारा... तर काही युजर्सनी इरफान पठाण याच्या वक्तव्याचे समर्थन केले. तर काहींच्या मते, वॉर्नर एका बाजूने आपले काम करत होता... दुसऱ्या बाजूला कुणी धावाच काढत नाही.. तर त्यात वॉर्नरची काय चूक... अशा वेगवेगळ्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. 

















वॉर्नरची ५१ धावांची खेळी - 
एका बाजूला विकेट पडत असताना डेविड वॉर्नर याने संयमी फलंदाजी करत दिल्लीच्या डावाला आकार दिला. डेविड वॉर्नर याने 47 चेंडूत संयमी 51 धावांची खेळी केली. या खेळीत वॉर्नर याने सहा चौकार लगावले. वॉर्नर याने संथ फलंदाजी केली. त्याच्या बॅटवर चेंडू येत नव्हता.. त्यात दुसऱ्या बाजूने विकेट पडत होत्या. पण डेविड वॉर्नर याने संयमी फलंदाजीचे प्रदर्शन केलेय. डेविड वॉर्नर याने सलामीला पृथ्वी शॉ याच्यासोबत 33 धावांची भागिदारी केली. त्यानंतर मनिष पांडे याच्यासोबत 43 धावा जोडल्या. तर अक्षर पटेल याच्यासोबत 67 धावांची भागिदारी केली.