Amit Mishra in IPL 2023 : अटीतटीच्या लढतीत गुजरातने लखनौचा सात धावांनी पराभव केला आहे. अखेरच्या चार षटकात लखनौने सामना गमावला. पण या सामन्यात अमित मिश्रा याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये अमित मिश्रा याने १७० विकेट घेण्याचा पराक्रम केलाय. गुजरातच्या अभिनव मनोहर याला तंबूत पाठवत अमित मिश्राने आयपीएलमध्ये १७० विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. त्याने आज लसिथ मलिंगाची बरोबरी केली आहे.

  


अमित मिश्रा याने गुजरातविरोधात भेदक मारा केला. अमित मिश्रा याला फक्त दोन षटके गोलंदाजी करता आली. पण या दोन षटकात अमित मिश्रा याने प्रभावी मारा केला. अमित मिश्रा याने दोन षटकात नऊ धावा देत एक विकेट घेतली. अमित मिश्रा याने धोकादायक अभिनव मनोहर याला तंबूचा रस्ता दाखवला. अमित मिश्राजीची ही १७० वी विकेट ठरली. अमित मिश्राने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत लसिथ मलिंगाला मागे टाकलेय. अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम डेवेन ब्राव्हो याने केलाय. ब्राव्होने १६१ सामन्यात १८३ विकेट घेतल्या आहेत. लसिथ मलिंगा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमित मिश्रा तिसऱ्या क्रमांकावर आहे. आर. अश्विन १५९ विकेटसह चौथ्या स्थानावर आहे.


आयपीएलमध्ये अमित मिश्राची कामगिरी कशी ?


40 वर्षीय अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये अनेक विक्रम केले आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजात तो आघाडीच्या पाच गोलंदाजामध्ये आहे.   आयपीएलमध्ये अमित मिश्रा याने 158 सामन्यात 24 च्या सरासरीने 170 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनमी रेट 7.36 इतका राहिलाय. आयपीएलमध्ये १७ धावा देत पाच विकेट अमित मिश्राची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. याशिवाय अमित मिश्रा याने आयपीएलमध्ये हॅट्ट्रीक घेण्याचा पराक्रमही केलाय. आता तो 40 व्या वर्षीही तरुण गोलंदाजांना लाजवेल कशी कामगिरी करतोय.  


गुजरातचा लखनौवर विजय - 


Lucknow Super Giants vs Gujarat Titans Last Over: गुजरात आणि लखनौ यांच्यातील सामना अटीतटीचा झाला. लो स्कोअरिंग सामन्यात दोन्ही संघाच्या बाजूने सामना झुकत होता. प्रत्येक षटकानंतर सामना रोमांचक होत होता. गुजरातने अखेरच्या षटकात बाजी मारत सात धावांनी विजय मिळवला.  १५ षटकांपर्यंत लखनौचा विजय नक्की मानला जात होता.  केएल राहुल, कृणाल पांड्या आणि मायर्स यांनी लखनौच्या विजयासाठी प्रयत्न केले. लखनौला अखेरच्या चार षटकात विजयासाठी २७ धावांची गरज होती. पण इथूनच गुजरातने सामना आपल्या बाजूने फिरवला.  गुजरातने अखेरच्या ४६ चेंडूवर लखनौला एकही चौकार अथवा षटकार मारु दिला नाही.