MS Dhoni Naveen Ul Haq IPL 2023 : चेन्नई आणि लखनौ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. इकाना स्टेडिअमवर सामना रंगला होता. धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना सात विकेटच्या मोबदल्यात 125 धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पंचांनी पावसामुळ हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाला समान गुण देण्यात आले. सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी आणि लखनौ संघातील खेळाडूंची भेट झाली. यामध्ये नवीन उल हक याचाही समावेश होता. विराट कोहलीसोबत झालेल्या वादानंतर नवीन उल हक आणि धोनी यांच्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी विराट कोहलीला ट्रोल केलेय. विराट कोहलीला असा आदर कधीच मिळणार नाही... असेही काही नेटकऱ्यांनी म्हटलेय. धोनी आणि नवीन यांचा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झालाय.  लखनौ संघानेही आपल्या सोशल मीडियावर धोनी आणि नवीन यांचा फोटो पोस्ट केलाय. 


लखनौने गुरुवारी ट्विटरवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये धोनीसोबत लखनौचे खेळाडू दिसत आहेत. नवीन-उल-हक यानेही धोनीसोबत फोटो काढला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी विराट कोहलीवर निशाणा साधलाय.  लखनौ आणि आरसीबी यांच्यात सोमावारी सामना झाला. या सामन्यावेळी विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. 



















आरसीबीने इकाना स्टेडिअमवर लखनौचा १८ धावांनी पराभव करत हिशोब चुकता केला होता. बेंगलोरमध्ये लखनौने आरसीबीचा पराभव केला होता. इकाना स्टेडिअमवर सामना झाल्यानंतर   कोहली आणि गंभीर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्याआधी नवीन-उल-हकही कोहलीशी भिडला होता. आयपीएलने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांना सामन्याच्या शंभर टक्के दंड ठोठावला होता..तर नवीन उल हक याला पन्नास टक्के दंड लगावला होता.