IPL 2022 Ticket booking : आयपीएलचा 15 वा हंगामात उत्तरार्धाकडे झुकला आहे. यंदाच्या हंगामातील साखळी सामने 21 मे रोजी संपणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे सामने सुरु होणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर क्वालीफायर 1 आणि एलिमिनेटर सामना होणार आहे. या सामन्याची ऑनलाईन तिकीट विक्री सुरु झाली आहे. पाहूयात.. किती असेल तिकीटाची किंमत आणि कसे कराल बूक....
क्वालीफायर 1: 24 मे (ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता)एलिमिनेटर: 25 मे (ईडन गार्डन स्टेडियम, कोलकाता)
आयपीएल 2022 चा क्वालीफायर 1 कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये 24 मे रोजी होणार आहे. गुणतालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचा संघ आमनेसामने असेल... क्वालीफायर 1 जिंकणारा संघ थेट फायनलला पोहचणार आहे. तर गुणतालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा संघ 25 मे रोजी भिडणार आहे. एलिमिनेटर जिंकणाऱ्या संघाचा सामना क्वालीफायर 1 हारणाऱ्या संघासोबत होणार आहे. जो क्वालीफायर 2 सामना जिंकेल तो फायनलमध्ये क्वालीफायर 1 च्या विजेत्यासोबत लढणार आहे. क्वालीफायर 2 आणि फायनल सामना गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
ईडन गार्डनवर होणाऱ्या सामन्याची तिकीटाची किंमत किती?ईडन गार्डनच्या वेगवेगळ्या स्टँडची तिकीटे आहेत. तिकीटाची सुरुवात 800 रुपयांपासून तीन हजार रुपयांपर्यंत आहे. तिकीटाला पाच कॅटेगरीमध्ये विभागल आहे. 800 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये आणि 3000 रुपये... अशी किंमत असणार आहे.
बुकिंग कसे कराल?तिकीट बुकिंग करण्यासाठी सर्वात आधी बूक माय शो वर जा... स्पोर्ट्स कॅटेगरीवर क्लिक करा...क्वालीफ़ायर 1 आणि एलिमिनेटर चा पर्याय दिसेल. जो सामना तुम्हाला पाहायचा तो निवडामोबाईल क्रमांक अथवा मेल आयडीने व्हेरिफाय करा.. सर्वात खाली BOOK लिहिलेलं दिसेल..त्यावर क्लिक करा किती तिकीटे घ्यायची आहेत, त्याची संख्या भरा... त्या तिकीटाची किंमत भरा... तुमचे तिकीट बूक झाले.