IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. गतविजेता चेन्नई आणि उपविजेता कोलकाता यांच्यात पिहला सामना झालाय. आयपीएलमध्ये प्रत्येक संघ आपल्या सर्वोत्तम 11 खेळाडूंना मैदानात उतरवत असतो. विदेशी आणि भारतीय खेळाडूंचं योग्य मिश्रण करण्यात येते. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 4 विदेशी खेळाडूंना खेळवण्याची परवानगी आहे. पहिल्या सामन्यात खेळवण्यासाठी कोलकाता संघात चार विदेशी खेळाडू उपलब्ध नव्हते. त्यामुळे पहिल्या सामन्यात कोलकाता तीन विदेशी खेळाडूसह मैदानात उतरला होता. काही खेळाडू आपल्या देशासाठी खेळत आहेत. तर काही खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तर काही खेळाडू विलगीकरणात आहेत. त्यामुळे पहिल्या काही सामन्यात काही खेळाडू उपलब्ध नसणार आहेत. याचा संघाना फटका बसण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या संघासाठी कोण कोणते खेळाडू पहिल्या काही सामन्यासाठी उपलब्ध नाहीत.  


मुंबई इंडियन्स : स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव 27 मार्च रोजी होणाऱ्या दिल्लीविरोधातील सामन्याला उपलब्ध नसेल. वेस्ट विंडिज विरोधातील टी 20 सामन्यादरम्यान सुर्यकुमार यादव दुखापत झाली होती.  


चेन्नई सुपर किंग्स : वेगवान गोलंदाज दीपक चाहर दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसणार आहे. चाहरने दुखापतीनंतर नेटमध्ये गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे.  


कोलकाता नाइट राइडर्स : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच सहा एप्रिलपर्यंत आयपीएलमद्ये खेलण्यासाठी उपलब्ध नसणार नाही. कारण सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान दौरा पाच एप्रिल रोजी संपणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे सर्व खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होणार आहेत. फिंचशिवाय कमिन्सही सुरुवातीच्या सामन्यांना उपलब्ध नाही. तसेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साउदी घरगुती कारणामुळे सुरुवातीचे काही सामने मुकणार आहे. तसेच प्लेऑफ आणि फायनलही खेळण्याची शक्यता कमी आहे, कारण त्याकाळात न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. 


सनराइजर्स हैदराबाद : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सीन एबॉट सहा एप्रिलपर्यंत उपलब्ध नसेल.


रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: ग्लेन मैक्सवेल घरगुती कारणामुळे सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही. त्याशिवाय जोश हेजलवुड आणि जेसन बेहरेनडॉर्फही तीन सामन्याना उपलब्ध नाहीत.   


दिल्ली कॅपिटल्स : डेविड वार्नर आणि मिशेल मार्श 6 एप्रिलपर्यंत अनुपलब्ध असतील. एनरिच नॉर्टजे दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकणार आहे.  


पंजाब किंग्स : कगिसो रबाडा सुरुवातीच्या काही सामन्याना खेळणार नसल्याचे वृत्त आहे. जॉनी बेयरस्टो इंग्लंड संघासोबत वेस्ट विंडिजमध्ये आहे, त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकणार आहे.  


राजस्थान रॉयल्स :  रॉसी वैन डेर डूसन काही सामन्यांना मुकण्याची शक्यता 


लखनऊ सुपर जायंट्स : जेसन होल्डर आणि कायल मेयर्स आठडाभरानंतरच उपलब्ध होणार आहेत. पाकिस्तान दौऱ्यावर असणारा ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टोइनिसही सहा तारखेनंतर उपलब्ध असेल.  


गुजरात टाइटन्स :  अल्जारी जोसेफ पहिल्या सामन्यांना मुकणार आहे.