IPL 202, GT vs SRH : गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने मोक्याच्या क्षणी अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. हार्दिक पांड्याने अर्धशतकी खेळी केली. पण हार्दिक पांड्याच्या संथ खेळीवर नेटकरी भडकले. हार्दिक पांड्याला विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखलं जाते. पण हैदराबादविरोधातील सामन्यात हार्दिक पांड्याला संथ फलंदाजी करताना पाहून नेटकऱ्यांना राग अनावर आला. हार्दिक पांड्याने 42 चेंडूत अर्धशतकी खेळी केली आहे. हार्दिक पांड्याच्या संथ फलंदाजीनंतर गुजरातच्या चाहत्यांना राग अनावर आला. त्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला. 


हार्दिक पांड्याने 42 चेंडूत 50 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पांड्याने एक षटकार आणि चार चौकार लगावले. पांड्याला विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखलं जाते. मात्र हैदराबादविरोधात पांड्याला धावांसाठी संघर्ष करावा लागला.  














































आयपीएलमध्ये सर्वात जलद षटकारांचं शतक करणारा हार्दिक पांड्या पहिल्या भारतीय खेळाडू ठरला आहे. तर, क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणार तिसरा फलंदाज ठरला आहे. हार्दिक पांड्यानं 96व्या आयपीएल सामन्याच्या 89व्या डावात षटकारांचे शतक पूर्ण केलंय. हार्दिक पांड्यानं हैदराबादविरुद्ध पहिला षटकार ठोकताच त्याच्या आयपीएलमधील षटकारांची संख्या दोनवरून तीन अंकी झाली. आयपीएलमध्ये 100 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारा तो 26 वा खेळाडू ठरला आहे. परंतु, सर्वात कमी चेंडूंमध्ये 100 षटकार मारणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्यानं अवघ्या 1046 चेंडूत हा पराक्रम केलाय. हार्दिक पांड्यापूर्वी भारताचा युवा फलंदाज आणि दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं 1224 चेंडूत 100 षटकार मारण्याचा विक्रम केला होता. हार्दिक आणि पंत यांच्यानंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं 1313 चेंडूत 100 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.