IPL Point Table : चेन्नई आणि पंजाबमधील सामन्यानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल झाला आहे. मयांकच्या नेतृत्वातील पंजाब संघ सहाव्या क्रमांकावर पोहचला आहे. तर चेन्नईचा संघ नवव्या स्थानावर आहे. त्याशिवाय दिल्ली आणि कोलकाता संघाला एका एका स्थानाचे नुकसान झालेय. गुणतालिकेत टॉप-5 स्थानामध्ये कोणताही बदल झालेला नाही. हार्दिक पांड्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स अव्वल स्थानावर कायम आहे.  

हार्दिक पांड्या नेतृत्वातील गुजरात संघाचा फक्त एक पराभव झाला आहे. सात सामन्यात सहा विजय मिळवत 12 गुणांसह गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर कायम आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत गुजरातचा संघ प्रथम स्थानावर आहे. तर सनराइजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल आणि लखनौ संघ दहा दहा गुणांसह टॉप पाचमध्ये आहेत.  मयांकच्या नेतृत्वातील पंजाबसंघ आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे...

पाहा गुणतालिका

क्रमांक संघ सामने विजय पराभव  नेट रन रेट गुण
1 गुजरात 7 6 1 0.396 12
2 हैदराबाद 7 5 2 0.691 10
3 राजस्थान 7 5 2 0.432 10
4 लखनौ 8 5 3 0.334 10
5 आरसीबी 8 5 3 -0.472 10
6 पंजाब 8 4 4 -0.419 8
7 दिल्ली 7 3 4 0.715 6
8 कोलकाता 8 3 5 0.080 6
9 चेन्नई 8 2 6 -0.538 4
10 मुंबई 8 0 8 -1.000 0

गुणतालिक गुजरात संघ अव्वल आहे. पण पर्पल आणि ऑरेंज कॅपवर राजस्थानच्या खेळाडूंनी कब्जा केला आहे. ऑरेंज कॅप जोस बटलरकडे आहे तर पर्पल कॅप यजुवेंद्र चहलच्या डोक्यावर आहे...

ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोण आहे?

क्रमांक  फलंदाज सामने धावा सरासरी स्ट्राईक रेट
1 जोस बटलर 7 491 81.83 161.51
2 केएल राहुल 8 368 61.33 147.798
3 शिखर धवन 8 302 43.14 132.45
4 हार्दिक पांड्या 6 295 73.75 136.57
5 तिलक वर्मा 8 272 45.33 140.20
6 फाफ डु प्लेसिस 8 255 31.88 130.10

पर्पल कॅपसाठी कोण कोण दावेदार?

क्रमांक गोलंदाज सामना  विकेट गोलंदाजी सरासरी इकनॉमी रेट
1 युजवेंद्र चहल 7 18 11.33 7.28
2 टी नटराजन 7 15 14.53 8.07
3 ड्वेन ब्रावो 8 14 18.50 8.73
4 कुलदीप यादव 7 13 17.38 8.47
5 उमेश यादव 8 11 21.63 7.43

हे देखील वाचा-