MS Dhoni IPL 2022 : भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीचे जगभरात चाहते आहेत. चाहते धोनीला भेटण्यासाठी सर्व हद्द ओलांडण्यास तयार होतात.. धोनीला भेटण्यासाठी काहीही करण्यास चाहते तयार होतात.. याचाच प्रत्येय शुक्रवारी राजस्थान आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात आला.
चेन्नईची फलंदाजी सुरु असताना 11व्या षटकात अंबाती रायुडू बाद झाल्यानंतर धोनी मैदानात फलंदाजीसाठी येत होता. त्यावेळी धोनीचा एक चाहता 7 नंबरची जर्सी घालून मैदानात आला. त्याने केवळ मैदानातच प्रवेश केला नाही तर धोनीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही केला. पण पंच ख्रिस गॅफनी त्या चाहत्यासमोर भिंतीसारखे उभे राहिले. चाहत्याला धोनीपर्यंत पोहचू दिले नाही. तरीही पण कॅप्टन कूलला इतक्या जवळून बघून त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय...
पाहा व्हिडीओ
लाइव्ह सामन्यादरम्यान धोनीसाठी चाहते मैदानात उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही चाहत्यांना अनेक प्रसंगी असे करताना पाहिलेय. एका चाहत्याने तर मैदानात चाहून धोनीचे आशिर्वाद घेतले होते.. यासारखे अनेक प्रसंग घडलेत.
दरम्यान, राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजीत महत्वाची एक विकेट घेतली तर फलंदाजीमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 151 धावांचे आव्हान चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले. या विजयासह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत टॉप 2 मध्ये प्रवेश केलाय. 24 मे रोजी राजस्थान आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे.
151 धावांचा आव्हान पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला जोस बटलर अवघ्या दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही 15 धावा काढून बाद झाला. देवदत्त पडिकल तीन धावा काढून बाद झाला.. पण त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन यांनी डाव सावरला. जोडी जमली असे वाटत असतानाच 59 धावांवर यशस्वी बाद झाला. यशस्वीने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यशस्वी बाद झाल्यानंतर आर अश्विनने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. अश्विनने रियान परागसोबत राजस्थानला विजय मिळवून दिला. अश्विन आणि रियान पराग यांनी 20 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. अश्विनने नाबाद 40 धावांची खेळी केली. रियान पराग 10 धावांवर नाबाद राहिला.
अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोईने अलीच्या 93 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईने केवळ 150 धावा केल्या.