KKR vs MI, 1 Innings Highlight : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या आजच्या सामन्यात दोन्ही संघाकडून एका तुफान खेळीची अपेक्षा होती. त्यानुसार केकेआरने सुरुवातीला दमदार गोलंदाजी केली, ज्यानंतर अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने दमदार फलंदाजी करत 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यामुळे आता केकेआरला विजयासाठी 162 धावांची गरज आहे.
आयपीएलच्या आजच्या सामन्यात सुरुवातीला मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा 3 आणि ईशान किशन 14 धावा करुन तंबूत परतले. डी ब्रेव्हिसने मात्र 19 चेंडूत 29 धावांची छोटी पण तुफान खेळी केली. ज्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी दमदार भागिदारी करत संघाला एक चांगली धावसंख्या मिळवून दिली. यावेळी सूर्याने 52 तर तिलकने नाबाद 38 धावा केल्या. अखेरच्या षटकात येत पोलार्डने तीन षटकार ठोकत 45 चेंडूत 22 धावा केल्या. ज्यामुळे मुंबईने 161 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. आता केकेआर 162 धावा करुन विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरले.
मुंबई अंतिम 11
रोहित शर्मा (कर्णधार) ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, किरॉन पोलार्ड, डी. ब्रेव्हिस, डॅनियल सॅम्स, मुरुगन आश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी.
कोलकाता अंतिम 11
अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, सॅम बिलिंग्स (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नारायण, पॅट कमिन्स, रसिख सलाम, उमेश यादव, वरुण चक्रवर्थी
हे देखील वाचा-
- पराभवानंतर राजस्थानला आणखी एक धक्का, अष्टपैलू खेळाडू आयपीएलमधून बाहेर
- IPL 2022, RR vs RCB: दिनेश-शाहबाजची रॉयल खेळी, राजस्थानचा चार गड्यांनी पराभव
- Virat Kohli Runout : राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विराट धावचीत, व्हायरल झाली 'तिची' रिएक्शन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha