IPL 2022 : गुरुवारी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यामध्ये सामना होणार आहे. यंदाच्या हंगमातील हा 24 वा सामना असेल. हा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. यंदाच्या हंगमात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजतार टायन्स संघाने चार सामन्यात तीन विजय मिळवले आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघानेही पहिल्या चार सामन्यात तीन विजय मिळवले आहे. चांगल्या नेट रनरेटमुळे गुणतालिकेत राजस्थानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातचा संघ सहा गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
डीवाय पाटील स्टेडिअमवर दोन्ही संघाची कामगिरी-नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. यापैकी राजस्थान संघाचा दोन सामन्यात विजय तर एका सामन्यात पराभव झाला आहे. या मैदानावर राजस्थान रॉयल्सने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. मुंबईला राजस्थानने हरवले होते. हार्दिक पांड्याच्या गुजरात संघाने या मैदानावर एक सामना खेळला आहे. या सामन्यात गुजरातला हैदराबादकडून पराभव स्विकारावा लागला होता. गुजरातसाठी दिलासादायक बाब म्हणजे हार्दिक पांड्याने या मैदानावर अर्धशतकी खेळी केली होती.
पिच रिपोर्टडीवाय पाटील मैदानाची खेळपट्टी फिरकीस पोषक आहे. या मैदानावर फिरकी गोलंदाजांचा दबबा राहू शकतो. गुजरातच्या संघात राशिद खानसारखा दर्जेदार फिरकी गोलंदाज आहे. तर राजस्थानच्या संघात चाहल आणि अश्विनची जोडी आहे.
राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ -
संजू सॅमसन कर्णधार/विकेटकिपर
जोस बटलर विकेटकिपरअनुनयसिंह विकेटकिपरध्रुव्ह जुरेल विकेटकिपर
यशस्वी जैस्वाल फलंदाजशिमरॉन हेटमायर फलंदाजदेवदत्त पडिक्कल फलंदाजकरुण नायर फलंदाजरॅसी वॅन डेर ड्यूसेन फलंदाज
पराग रियान अष्टपैलूरवीचंद्रन आश्विन अष्टपैलूजेम्स निशम अष्टपैलूडॅरेल मिचेल अष्टपैलूशुभम गढवाल अष्टपैलू
ट्रेण्ट बोल्ट गोलंदाजप्रसिध कृष्णा गोलंदाजयुजवेंद्र चहल गोलंदाजनवदीप सैनी गोलंदाजओबेद मेकॉय गोलंदाजकुलदीप यादव गोलंदाजकुलदीप सेन गोलंदाजतेजस बोरका गोलंदाजनॅथन कुल्टर नायल गोलंदाजकेसी करिअप्पा गोलंदाज
गुजरात टायटन्सचा संपूर्ण सघ -
हार्दिक पड्या कर्णधार/अष्टपैलू
मॅथ्यू वेड विकेटकिपरवृद्धीमान साहा विकेटकिपररहमानुल्लाह गुरबाज विकेटकिपर
शुभमन गिल फलंदाज अभिनव मनोहर फलंदाजडेविड मिलर फलंदाजगुरकीत सिंह फलंदाजसाई सुदसेन फलंदाज
राशिद खान गोलंदाजलॉकी फर्ग्युसन गोलंदाजअल्झारी जोसेफ गोलंदाजमोहम्मद शमी गोलंदाजदर्शन नालकंडे गोलंदाजडॉमनिक ड्रेक्स गोलंदाजजयंत यादव गोलंदाजनूर अहमद गोलंदाजप्रदीप सांगवान गोलंदाजयश दयाल गोलंदाजवरुण एरॉन गोलंदाजसाई किशोर गोलंदाज
राहुल तेवातिया अष्टपैलूविजय शंकर अष्टपैलू