CSK vs GT, IPL 2022 : प्लेऑफमध्ये स्थान पक्के करणारा हार्दिक पांड्याचा गुजरात आणि स्पर्धेतील आव्हान संपलेला धोनीचा चेन्नईचा संघ आज आमनेसामने असतील. गुजरातचा संघ गुणतालिकेतील अव्वल दोनमध्ये स्थान पक्के काढण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. तर चेन्नईचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्तातील गुजरात संघाने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली. गुजरातने 12 सामन्यात नऊ विजय मिळवत 18 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केलेय. गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. गुजरातचा संघ दोन स्थानावर आव्हान कायम राखण्याच्या दृष्टीने मैदानात उतरेल. धोनीच्या नेतृत्वातील चेन्नईच्या संघाची यंदाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. चेन्नईचा संघ गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहे. गतविजेता चेन्नईच्या संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरेल..
गुजरातकडून गिल, साहा आणि हार्दिक पांड्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. तर तेवातिया आणि मिलर जबरदस्त फिनिशिंग देत आहेत. त्याशिवाय गोलंदाजीत मुहम्मद शमी, लाकी फर्ग्यूसन आणि राशिद खान जलवा दाखवत आहेत. चेन्नईकडून फलंदाजीची सर्व मदार ऋतुराज गायकवाड आणि कॉन्वे यांच्यावर आहे. या दोघांव्यतिरिक्त धोनीनेही काही सामन्यात जलवा दाखवला आहे. इतर फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. गोलंदाजीत मुकेश चौधरी आणि तिक्षणा यांचा अपवाद वगळता गोलंदाज प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरत आहेत.
कधी आहे सामना?
आज 15 मे रोजी होणारा चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तीन वाजता नाणेफेक होईल. नाणेफेकीचा कौल महत्वाचा ठरणार आहे.
कुठे आहे सामना?
हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामना?
चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज आणि बातम्या पाहाता येईल.