IPL 2022, LSG vs CSK Match Highlights : लखनौचा चेन्नईवर सहा विकेटने विजय

IPL 2022, LSG vs CSK :  पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 

नामदेव कुंभार Last Updated: 31 Mar 2022 11:40 PM

पार्श्वभूमी

IPL 2022,  LSG vs CSK : आयपीएलच्या 15 व्या हंगमाताली  पहिल्या विजयासाठी लखनौ आणि चेन्नईचा संघ मैदानावर उतरणार आहेत. यंदाच्या हंगमातील पहिल्या सामन्यात दोन्ही संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता....More

IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates : लखनौचा चेन्नईवर सहा विकेटने विजय

IPL 2022, LSG vs CSK Match Live Updates :  कर्णधार के.एल राहुल आणि क्विंटन डिकॉक यांच्या तुफानी सलामीनंतर एविन लुईसच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर लखनौसंघाने 211 धावांचे आव्हान सहा गाडी राखून सहज पार केले. लखनौने 19.3 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 211 धावा केल्या. लखनौकडून क्विंटन डिकॉकचे आणि लुईस यांनी अर्धशतकी खेळी केली.  डिकॉकने 61 तर लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर राहुलने 40 धावांची छोटेखानी खेळी केली. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील लखनौचा हा पहिला विजय आहे. लखनौला पहिल्या सामन्यात गुजरातकडून पराभव स्विकारावा लागला होता. चेन्नईचा हा सलग दुसरा पराभव आहे.