GT vs SRH : आज आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (kolkata Knight Riders vs Rajsthan Royals) यांच्यात पार पडणार आहे. गुणतालिकेचा विचार करता राजस्थानने आतापर्यंत 9 पैकी 6 सामने जिंकत गुणतालिकेत टॉप 4 मध्ये स्थान मिळवलं आहे. तर कोलकात्याचा संघ मात्र 9 पैकी 3 सामने जिंकल्याने अतिशय खालच्या स्थानावर आहे. आजवरच्या लढतींमध्ये दोन्ही संघाच्यातील विजय आणि पराभव बऱ्यापैकी समसमान असल्याने आजची लढत चुरशीची होण्याची दाट शक्यता आहे. तर आजच्या या चुरशीच्या सामन्याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे. 


आज होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स  (KKR vs RR) या सामन्यात दोन्ही संघाकडून विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले जाणार यात शंका नाही. दोन्ही संघानी आतापर्यंत हंगामात चांगली कामगिरी केली असल्याने आजचा सामना पाहण्याजोगा असेल. तर  आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 2 मे रोजी होणारा कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 7 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना मुंबईच्या प्रसिद्ध अशा वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील आजचा सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-