KKR vs RR, Match Live updates : कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय

आयपीएलमध्ये (IPL 2022) यंदाच्या हंगामातील 47 वा सामना कोलकाता आणि राजस्थान या संघामध्ये वानखेडे मैदानात पार पडणार आहे.

abp majha web team Last Updated: 02 May 2022 11:22 PM

पार्श्वभूमी

KKR vs RR, Live Score : आयपीएलमधील(IPL 2022) आजचा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (KKR vs RR)असा पार पडणार आहे. गुणतालिकेचा विचार करता आतापर्यंत 9 पैकी...More

कोलकात्याचा राजस्थानवर सात विकेट्सनं विजय

Indian Premier League 2022: मुंबईच्या (Mumbai) वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium) खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्स राखून पराभूत केलं आहे.या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकात्याच्या संघानं राजस्थानला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. दरम्यान, राजस्थानच्या संघानं 20 षटकात पाच विकेट्स गमावून 151 धावा केल्या होत्या. नितीश राणा आणि रिंकू सिंहनं संयमी खेळी करत कोलकात्याला सामना जिंकून दिलाय. राजस्थानला पराभूत करून कोलकात्याच्या संघानं या हंगामातील चौथा विजय मिळवला आहे. या विजयासह कोलकात्याच्या संघाचं आठ गुण झाले आहेत.