Kane Williamson On Umran Malik: सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या चर्चेचा विषय ठरतोय. आपल्या वेगामुळं जम्मू काश्मीरच्या नावानं प्रसिद्ध मिळवणाऱ्या उमरान मलिकनं आयपीएलच्या पंधराव्या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष्य वेधून घेतलंय. यंदाच्या हंगामात त्यानं 13 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यानं भेदक गोलंदाजी करत महत्वाच्या तीन फलंदाजाला माघारी धाडलं. ज्यानंतर हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसननं उमरान मलिकबाबत मोठं वक्तव्य केलंय.
विल्यमसन म्हणाला की, "मुंबईविरुद्ध हैदराबादच्या तीन धावांनी विजय मिळवण्यात उमरानचा मोठा वाटा होता. उमरान मलिकची गोलंदाजी शानदार आहे. त्यानं प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तो ज्या पद्धतीनं गोलंदाजी करत आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याच्या गोलंदाजीमुळं फलंदाज नेहमीच दडपणाखाली असतात. तो हैदराबादच्या संघाची खरी ताकद आहे." हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असेल, परंतु त्यांची डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी उत्कृष्ट होती असं बोलत विल्यमसननं हैदराबादच्या विजयाचं श्रेय आपल्या गोलंदाजांना दिलं.
भुवनेश्वर कुमारला गोलंदाजी देण्यावर केन विल्यमसन काय म्हणाला?
19व्या षटकात भुवनेश्वर कुमारला चेंडू देण्याच्या निर्णयावर विल्यमसन म्हणाला, "मला वाटतं त्याला चेंडू सोपवणं संघासाठी फायदेशीर ठरलं आहे. त्यानं या षटकात एकही धाव दिली नाही आणि एक विकेटही घेतली. आमची डेथ ओवर्समधील गोलंदाजी हीच आमची खरी ताकद आहे."
हैदराबादचा मुंबईवर तीन धावांची विजय
मुंबईविरुद्ध सामन्यातही सनरायजर्स हैदराबादच्या वेगवान गोलंदाज उमरान मलिकनं चमकदार कामगिरी करून दाखवली. या सामन्यात त्यानं मुंबईच्या तीन महत्वाच्या फलंदाजानं आपल्या जाळ्यात अकडलं. ज्यामुळं हैदराबादच्या संघाला सामन्यावर मजूबत पकड मिळवता आली. हैदराबादनं दिलेल्या 194 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाची दमछाक झाली. मुंबईनं 20 षटकात सात विकेट्स गमावून 190 धावा केल्या. हा सामना हैदराबादच्या संघानं तीन धावांनी जिंकला.
हे देखील वाचा-