IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची दण्यात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत दोन डझन सामने झाले आहेत. या सामन्यात युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये आपला पहिलाच आयपीएल हंगाम खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपल्या कामगिरीने धमाल केली आहे. सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या खेळाडूंना आयपीएल संघांनी मूळ किंमतीमध्ये खरेदी केले. या खेळाडूंनी दमदार खेळी करत आपलं नाव केले आहे. या खेळाडूंनी अल्पावधीतच क्रीडा प्रेमींच्या मनात आपलं नाव कोरलं आहे. पाहूयात याच खेळाडूबद्दल...
तिलक वर्मा
मुंबई इंडियन्सने यंदा तिलक वर्माला शोधलं आहे. तिलक वर्माने आतापर्यंत दमदार कामगिरी केली. मुंबईची मधल्या फळीत तिलक वर्माने चांगली कामगिरी केली. आहे. तिलक वर्माने आतापर्यंत 39.25 च्या शानदार सरासरीने पाच सामन्यात 157 धावा चोपल्या आहेत. तिलक वर्माची फलंदाजीने रोहित शर्मा, महेला जयवर्द्धने सारखे दिग्गज खेळाडू प्रभावित आहेत.
डेवाल्ड ब्रेविस
मुंबईचाच दुसरा खेळाडू डेवाल्ड ब्रेविस याला बेबी एबी म्हणून ओळखलं जातं. नुकतेच अंडर 19 खेळलेल्या या युवा खेळाडूचा हा आयपीएलचा पहिलाच हंगाम आहे. पहिल्याच हंगामात आपल्या विस्फोटक फलंदाजीने ब्रेविसने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तीन सामन्यात ब्रेविस याने 86 धावांची खेळी केली. नुकत्याच झालेल्या सामन्यात ब्रेविसने 49 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान चाहरच्या एका षटकात 29 धावा चोपल्या होत्या.
जितेश शर्मा
पंजाबच्या जितेश शर्माचेही सोशल मीडियावर कौतुक होत आहे. विकेटकिपर-फलंदाज जितेशने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. जिथेश शर्माने 183 च्या सरासरीने धावा चोपल्या आहेत.
वैभव अरोरा
पंजाबचा वैभव अरोराही चर्चेत आहे. वैभव अरोराने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधल आहे. नव्या चेंडूने विकेट घेण्याची किमया वैभव अरोरा करतोय. तीन सामन्यात वैभवने तीन विकेट घेतल्या आहेत.
आयुष बदोनी
लखनौच्या आयुष बदोनी याने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आयुष बदोनी भविष्यात भारताचा फिनिशर म्हणून नावारुपाला येऊ शकतो. षटकार-चौकार मारण्यात पटाईत असलेला आयुष बदोनी अल्पावधीतच प्रसिद्ध झाला आहे. आयुष बडोनी याने पदार्पणाच्या सामन्यात तुफानी खेळी केली. दबावाद आयुष बडोनी याने 41 चेंडूत 54 धावांचे योगदान दिले. 22 वर्षीय आयुष बडोनी दिल्लीसाठी क्रिकेट खेळतो. आतापर्यंत बडोनीला 'लिस्ट A' आणि 'फर्स्ट क्लास' क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेली नाही. बडोनीला एकदा भारतीय अंडर 19 संघात श्रीलंकाविरोधात स्थान मिळाले होते. श्रीलंकाविरोधात यूथ टेस्ट सामन्यात बडोनीने नाबाद 185 धावांची खेळी केली होती. 2018 मध्ये झालेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात आयुष बडोनीने 28 चेंडूत 52 धावांची विस्फोटक फलंदाजी केली होती. 2018 मध्ये झालेल्या आशिया चषकात आयुष बडोनीने 83 च्या सरासरीने 186 धावा चोपल्या होत्या. फलंदाजीसोबत बडोनी फिरकी गोलंदाजीही करु शकतो.
सुयश प्रभुदेसाई -
सलामीच्या सामन्यात 18 चेंडूत 34 धावांची खेळी करणाऱ्या सुयशने एक अप्रतिम रनआऊट देखील केला. सुयश प्रभुदेसाई हा 24 वर्षीय क्रिकेटपटू गोवा संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याच्याकडे स्थानिक क्रिकेटचा चांगला अनुभव असून त्याने 19 प्रथम श्रेणी सामन्यांसह, 34 लिस्ट-ए सामने आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यात सुयशने 42.88 च्या सरासरीने 1 हजार 158 रन केले आहेत. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 787 रन आहेत. स्थानिक टी-20 सामन्यात सुयशचा रेकॉर्ड दमदार आहे. त्याने 23 टी-20 सामन्यात 31.80 च्या सरासरीने आणि 150.47 च्या स्ट्राईक रेटने 477 रन केले आहेत. त्याच्या टी-20 मधील विस्फोटक स्ट्राईक रेटमुळेच त्याला IPL मध्ये संधी मिळाली आहे. सुयशला यंदाच्या महालिलावात आरसीबीने त्याच्या बेस प्राईज 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.